लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फवारणीच्या विषबाधेमुळे जिल्ह्यात २२ शेतकरी, शेतमजूर मृत्युमुखी पडले. शेकडोंना विषबाधा झाली. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. अनपेक्षित कोसळलेल्या संकटातून या कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतल्याची ग्वाही राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी येथे दिली. शिवसेनेच्यावतीने स्थानिक उत्सव मंगल कार्यालयात, फवारणीत मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी कुटुंबीयांसाठी आयोजित भाऊबीज भेट कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महसूल राज्यमंत्री संजय राठोड, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, वाशिमचे जिल्हा प्रमुख राजेश पाटील, सोमेश्वर पुसदकर, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष कांचन चौधरी आदी उपस्थित होते. फवारणीमुळे मृत्युमूखी पडलेल्या जिल्ह्यातील २२ शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबांना शिवसेनेतर्फे १० हजार रुपयांची रोख आर्थिक मदत, शेतकºयाची पत्नी व आईला साडीचोळी, मुला, मुलींना कपडे, दप्तर, वह्या आणि आवश्यक वस्तुंची किट भेट देण्यात आली.ना. संजय राठोड यांनी या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. यवतमाळातील फवारणीपीडित शेतकरी, शेतमजूर कुटुंबीयांना मदत केली. शिवसेना राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देते. शिवसेनेची पहिली बांधिलकी ही शेतकरी आणि सामान्य जनतेशी आहे, असे त्यांनी सांगितले. या सर्व कुटुंबांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न आहे. लवकरच या कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार रोजगार दिला जाईल, असे ना. राठोड म्हणाले.शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांनी शिवसेनेच्या या उपक्रमाचे कौतुक करून, शिवसेनेला शेतकºयांच्या वेदनेची खरी जाणीव असल्याचे सांगितले.प्रास्ताविक सोमेश्वर पुसदकर यांनी केले. संचालन शहर प्रमुख पराग पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, नगर परिषद अध्यक्ष, नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आदी उपस्थित होते.
फवारणीपीडित शेतकºयांच्या पुनर्वसनासाठी शिवसेना कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:51 AM
फवारणीच्या विषबाधेमुळे जिल्ह्यात २२ शेतकरी, शेतमजूर मृत्युमुखी पडले. शेकडोंना विषबाधा झाली. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे.
ठळक मुद्देदिवाकर रावते : भाऊबीज भेट कार्यक्रम, शेतकरी, शेतमजुरांना मदत