शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

शिवसेना नेत्यांमधील वाद समझोत्यापलीकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 10:16 PM

गेली कित्येक वर्षे संजय राठोड यांच्या नेतृत्वात एकसंघ असलेल्या जिल्हा शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात दुसरा गट तयार झाला आहे.

ठळक मुद्देलोकसभा, विधानसभेत फटका बसणार : उघड गटबाजीने काँग्रेस, भाजपाची आयतीच सोय

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेली कित्येक वर्षे संजय राठोड यांच्या नेतृत्वात एकसंघ असलेल्या जिल्हा शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात दुसरा गट तयार झाला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये समझोता होण्याची चिन्हे दिसत नसल्याने शिवसेनेतील सामान्य कार्यकर्तेही नाईलाजाने का होईना विभागले जाण्याची शक्यता आहे.भावना गवळी यांची खासदारकीची चौथी टर्म आहे. गेली कित्येक वर्षे त्यांनी जिल्ह्यात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात अथवा साथीने पक्षाचे काम केले. परंतु जिल्हा प्रमुख पदावरील नियुक्तीच्या निमित्ताने या नेत्यांमधील वाद अचानक उफाळून आला. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मिटला नाही. एवढेच काय खुद्द ‘मातोश्री’वर सुद्धा वाद मिटविण्याचे प्रयत्न झाले. परंतू यश आले नाही. भावना गवळींनी सूचविल्यानुसार तीन जिल्हा प्रमुखांच्या झालेल्या नियुक्त्यांमधून हा वाद मिटणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. तर काल-परवा संजय राठोड गटाच्या युवा सेना प्रमुखाला जिल्हा प्रमुख पदावरून निष्कासित करण्यात दुसऱ्या गटाला आलेले यश पाहता नेत्यांमधील हा वाद आणखी पेटणार असल्याची चिन्हे आहेत. रक्तदान शिबिरापासून हा वाद बराच वाढला आहे. आता तर हे नेते कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांची उपस्थिती असेल, फ्लेक्सवर फोटो असेल तरी तेथे जाणे टाळतात. यावरून या नेत्यांंमध्ये किती मोठ्या प्रमाणात कटुता निर्माण झाली, हे स्पष्ट होते. ही कटुता वाढविण्यास दोन्ही नेत्यांच्या अवती-भोवती वावरणारी चौकडी अधिक कारणीभूत असल्याचे बोलले जाते. यात पक्षाचे मात्र विविध स्तरावर नुकसान होत आहे. एकसंघ असलेला शिवसैनिकही आता उघडपणे गटा-तटात विभागला जातो आहे. ११ मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात येत आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तेथे चर्चा होणार आहे. मात्र नेत्यांमधील या वादावर तेथे चर्चा होण्याची आणि झालीच तर त्यातून फार काही तोडगा निघण्याची शक्यता नसल्याचे सेनेच्या गोटात मानले जाते.साम्राज्याला धक्के देण्याचा प्रयत्नसंजय राठोड यांच्या साम्राज्याला जणू धक्के देण्याचा निर्धारच विरोधी गटाने केल्याचे दिसून येते. आधी आपल्या सोईने तीन जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या ‘मातोश्री’वरुन करून आणल्या. त्यात भावना गवळींनी आपल्या सोईचा एकच जिल्हा प्रमुख आपल्या लोकसभा मतदारसंघात ठेवला. दुसऱ्या दोघांची चंद्रपूर व हिंगोली लोकसभा मतदारसंघात रवानगी करण्यात यश मिळविले. आता युवा सेना प्रमुख निशाण्यावर आहे. बाभूळगावातील सेना तालुका प्रमुख आधीच बदलविण्यात आले आहे. यवतमाळचा तालुका प्रमुख विरोधी गटाच्या सोईचा आहे. या लोकसभा मतदारसंघातील अन्य ठिकाणीही भविष्यात सोईने चेंज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारव्हा, दिग्रस, नेर या तीन तालुक्यांमध्ये मात्र विरोधी गटाकडून कोणताही हस्तक्षेप होण्याची शक्यता नाही. त्यांना तो अधिकारही नसल्याचे सांगितले जाते. चंद्रपूर व हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तालुक्यांमध्ये चेंजचा विरोधी गटाचा कदाचित ‘इन्टरेस्ट’ नसू शकतो.गटबाजीने सामान्य शिवसैनिक अस्वस्थसंजय राठोड व भावना गवळींमधील या वादात दोन्ही गटाचे काही निवडक समर्थक खूष दिसत असले तरी सामान्य शिवसैनिक व शिवसेनेला मानणारा मतदार वर्ग मात्र नाराज आहे. नेत्यांच्या या भांडणात पक्षाचे नुकसान होऊ नये, ही त्यांची प्रामाणिक भावना आहे. या नेत्यांमध्ये समेट न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला फटका बसण्याची व काँग्रेस, भाजपाला आयताच फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नेत्यांमधील हा वाद कायम राहिल्यास लोकसभा निवडणुकीत संजय राठोड समर्थकांची भाजपाच्या संभाव्य उमेदवाराला सहानुभूती राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हीच खेळी भावना गवळींकडून दिग्रस विधानसभा निवडणुकीत खेळली जाऊ शकते.राठोड समर्थक ‘आरपार’च्या तयारीतगेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा ९० हजार मतांनी पराभव झाला. या मतदारसंघासाठी नवखा उमेदवार व तयारीला कोणताही वेळ मिळाला नसताना राज्यात काँग्रेसचा उमेदवार सर्वात कमी मताने येथे पराभूत झाला. अर्थात मोदी लाट नसती तर शिवसेनेला पराभवाचे निश्चितच तोंड पहावे लागले असते.यावेळी नोटाबंदी, जीएसटी, आरक्षण या कारणांमुळे काँग्रेसला पोषक वातावरण आहे. या उलट स्थिती शिवसेनेची आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे सेनेला आणखी नुकसान होऊ शकते.गेल्या विधानसभेत संजय राठोड राज्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले होते. यावेळी सेनेतील दुसऱ्या गटाकडून दगा-फटका झाल्यास फार तर मतांचा लिड पाच-दहा हजाराने कमी होईल, यापेक्षा जास्त नुकसान होणे नाही, असा दावा राठोड समर्थकांकडून केला जात आहे. परंतु आता ‘इसपार या उसपार’ असे चित्र लोकसभा निवडणुकीत दिसणार असल्याचे संकेतही राठोड समर्थकांच्या चर्चेतून मिळत आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना