लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजप-सेना युतीचे गुºहाळ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाची रस्सीखेच सुरू असली तरी युती व आघाडीत जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोनच मतदारसंघांवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहे. एवढेच नव्हे तर मतदारसंघांच्या अदलाबदलीचे शिवसेनेचे प्रयत्नही पुसदमध्ये भाजपच्या आग्रही भूमिकेमुळे फेल ठरण्याची शक्यता आहे.भाजप-शिवसेना युती होणार की नाही याबाबत साशंकता कायम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित आहे. भाजप-सेना युती झाल्यास जिल्ह्यात जागा वाटपाचे चित्र फारसे बदलण्याची शक्यता नाही. ‘सिटींग-गेटींग’ हा फॉर्म्युला त्यासाठी अडचणीचा ठरला आहे. ते पाहता जिल्ह्यात दिग्रस व पुसद हे दोनच मतदारसंघ शिवसेनेला मिळणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. पुसद मतदारसंघावर शिवसेनेचा दावा आहे. मात्र तेथे सातत्याने सेनेचा पराभव झाल्याने हा मतदारसंघ भाजपला देऊन उमरखेड शिवसेनेकडे घेण्याचाही प्रस्ताव होता. मात्र हा फेरबदलही फारसा यशस्वी होण्याची चिन्हे नाहीत.राष्ट्रवादी पुसद, दिग्रस शिवाय वणीच्या जागेसाठी आग्रही आहे. मात्र ही तिसरी जागा मिळण्याची चिन्हे नाहीत. पुसदमध्ये आमदार मनोहरराव नाईक अथवा त्यांच्या पुत्रांकडे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. परंतु सत्तेच्या सोबत जाण्यासाठी पक्षांतर झाल्यास राष्ट्रवादीला तेथे उमेदवार शोधावा लागणार आहे. दिग्रसमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी वसंत घुईखेडकर उमेदवार आहेत. मात्र यावेळी ते तेवढे आग्रही दिसत नसल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी भाजपच्या एका काठावरच्या नाराज नेत्यानेही आपली अपक्ष लढण्याची परंपरा कायम ठेवण्याची तयारी चालविली आहे. ‘लोकसभेतील अमरावती पॅटर्न’नुसार काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढतीचा त्यांचा प्रस्ताव बारामतीत पोहोचलासुद्धा. भेटी-गाठीही झाल्या मात्र त्यांना घड्याळावर लढण्याची अट घालण्यात आली. निवडून येईलच याची शाश्वती नसल्याने त्यांची भाजप सोडण्याचीही तयारी नसल्याचे सांगितले जाते.एकूणच शिवसेना व राष्ट्रवादीला दोनच जागांवर समाधान मानावे लागेल असे दिसते. ते पाहता भाजपच्या जागांमध्ये कोणताही चेंज होणार नाही अशी चिन्हे आहे. मात्र उमेदवारांचे चेहरे काही ठिकाणी बदलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.पुतण्याकडून काकाच्या राजकीय कोंडीचा प्रयत्नपुसद मतदारसंघात स्वत: लढण्याची तयारी आमदार अॅड. नीलय नाईक यांनी जाहीर व्यक्त केली. विधान परिषदेची पाच वर्षे शिल्लक असताना नीलय यांचा विधानसभा लढण्याचा आग्रह कशासाठी? याचे कोडे अनेकांना उलगडलेले नाही. मात्र ही तयारी दर्शवून पक्षांतराच्या तयारीत असलेल्या काका व चुलत भावांना ब्रेक लावण्याचा फंडा तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. अटींमुळे सेना प्रवेश वांद्यात आल्याने आता भाजपात पक्षांतर होण्याची शक्यता आहे. ते होऊ नये म्हणून नीलय नाईकांनी स्वत:च लढण्याची तयारी दर्शवित पक्षांतरापूर्वीच नाईक पिता-पुत्रांची कोंडी केल्याचे राजकीय स्तरावर मानले जात आहे.दिग्रससाठी माजी खासदार पुत्राची मोर्चेबांधणीइकडे माजी खासदारपुत्रसुध्दा दिग्रस विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय आखाड्यात राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उतरण्यास इच्छूक आहे. त्यासाठी गावात कार्यकर्ते व समर्थकांच्या जेवणावळीही झडत आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात केवळ दोनच मतदारसंघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 6:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : भाजप-सेना युतीचे गुºहाळ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाची रस्सीखेच सुरू असली तरी युती व आघाडीत ...
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : युती, आघाडीचे जागा वाटप, अदलाबदलीची शक्यता कमीच