लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी ते यवतमाळ मार्गावरील पांढरकवडा तालुक्यात येणाऱ्या सायखेडा धरणावर परप्रांतीय मजुरांची अक्षरश: दबंगगिरी सुरू आहे. याठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या महिला व मुलींना त्या मजुरांमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असून आता या मजुरांना वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेने एल्गार पुकारला आहे.सायखेडा धरणावर मासेमारी करण्याचे कंत्राट घेणाऱ्या ठेकेदारांनी बिहार, उत्तरप्रदेश या राज्यांमधून मासेमारी करण्यासाठी परप्रांतीय मजुर आणले आहेत. या मजुरांनी पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठमोठे टिनाचे शेड उभारले आहे. तसेच काही ठिकाणी पक्के बांधकामसुद्धा केले. हे मजुर एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पर्यटक व अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या गेस्ट हाऊसवरसुद्धा अवैधरित्या ताबा मिळविला आहे. पाटबंधारे विभागातील काही भ्रष्ट कर्मचाºयांना हाताशी धरून त्यांच्या संगनमताने मासेमारी करणारे कंत्राटदार व परप्रांतीय मजुर पाटबंधारे विभागाची जागा गिळंकृत करीत असल्याचा आरोप केला जात आहे.हे परप्रांतीय मजुर गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची शंका आहे. गंभीर बाब ही की, या मजुरांची पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही. हे मजुर पाटबंधारे विभागाच्या जागेवर दिवसभर टवाळखोरी करीत असून पर्यटनासाठी आलेल्या महिला व मुलींना अश्लिल इशारे करून त्यांची छेडखानी करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या परिसरात राहणाºया महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे मजुर रांत्रदिवस या धरणावर राहत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता, या मजुरांना रात्रीच्यावेळी त्याठिकाणी थांबण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी आहे.मासेमारी करणाºया या मजुरांजवळ शस्त्रे, अग्नीशस्त्रे असल्याची चर्चाही या परिसरात आहे. त्यामुळे त्याचीही पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी आहे. स्थानिक मजुरांना मात्र या धरणावर मासेमारी करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. यातून स्थानिकविरूद्ध परप्रांतीय असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.पाटबंधारे विभागाकडे शिवसेनेची तक्रारयासंदर्भात शिवसेनेचे पांढरकवडा तालुका प्रमुख जयवंत वसंतराव बंडेवार यांनी पांढरकवडा पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंत्याकडे रितसर तक्रार केली असून या मजुरांची चौकशी करून त्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावे, तसेच त्यांच्या दबंगगिरीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी बंडेवार यांनी तक्रारीतून केली आहे. चौकशी न झाल्यास शिवसेनेच्यावतीने आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
परप्रांतीय मजुरांविरूद्ध शिवसेनेचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 10:25 PM
वणी ते यवतमाळ मार्गावरील पांढरकवडा तालुक्यात येणाऱ्या सायखेडा धरणावर परप्रांतीय मजुरांची अक्षरश: दबंगगिरी सुरू आहे. याठिकाणी पर्यटनासाठी येणाºया महिला व मुलींना त्या मजुरांमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असून आता या मजुरांना वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेने एल्गार पुकारला आहे.
ठळक मुद्देसायखेडा धरण : पर्यटक व महिला-मुलींना त्रास, धरण परिसरात अवैध बांधकाम