शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

यवतमाळ जिल्हा: भाजपच्या दोन विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा डोळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 2:58 AM

यवतमाळ जिल्ह्यातील चित्र : भाजपपुढे पाच जागा राखण्याचे तर काँग्रेसपुढे खाते उघडण्याचे आव्हान

राजेश निस्ताने यवतमाळ : आगामी विधानसभा निवडणुकीत पाचही मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भाजप मोर्चेबांधणी करीत असतानाच यातील दोन जागांवर शिवसेनेने दावा सांगून जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ निर्माण केली आहे.

सात पैकी आर्णी व राळेगाव हे विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी तर उमरखेड अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. दिग्रसमध्ये शिवसेनेचे संजय राठोड आणि पुसदमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचे मनोहरराव नाईक यांच्या रुपाने हे दोन मतदारसंघ ‘अघोषित आरक्षित’ मानले जातात. त्यामुळे वणी व यवतमाळ या दोनच मतदारसंघांवर जिल्ह्यातील राजकीय मंडळींच्या इच्छापूर्तीची मदार असते. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पाच जागा काँग्रेसकडे होत्या; परंतु २०१४ ला मोदी लाटेत काँग्रेसच्या या दिग्गजांचा पराभव करून पाचही जागा भाजपने आपल्याकडे खेचून घेतल्या. त्यावेळी भाजप व शिवसेना स्वबळावर लढले होते. त्यावेळी तीन मतदारसंघात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. यवतमाळात तर सेनेला अवघ्या १२३० मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. तोच धागा पकडून शिवसेनेने यावेळी युती झाल्यास पुसद, वणी व यवतमाळ मतदारसंघांवर पुन्हा दावा सांगितला आहे.

वणीमध्ये यापूर्वी विश्वास नांदेकर हे शिवसेनेचे आमदार होते. आजही वणीत सेनेचे वर्चस्व आहे. पुसदमध्ये नाईक घराण्यातील एखाद्या तरुणावर जाळे फेकून त्याला शिवसेनेचा उमेदवार बनविता येते का, या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. तिकडे उमरखेडमध्ये शिवसेनेचे चांगले नेटवर्क आहे.

भाजप मात्र ‘सिटींग-गेटींग’चा फॉर्म्युला पुढे करून एकही जागा सोडण्याच्या तयारीत नाही. वास्तविक भाजपने वरच्या स्तरावरून लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील उमरखेड व आर्णी हे दोन मतदारसंघ ‘रेडझोन’मध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते; परंतु लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघाच्या भाजप आमदारांनी युतीच्या उमेदवारासाठी मतांची मोठी आघाडी मिळवून देऊन आपला ‘परफॉर्मन्स’ सिद्ध केल्याने शिवसेनेपुढेही आता या जागा मागताना पेच निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पुसद व दिग्रस हे मतदारसंघ आहेत; परंतु यावेळी त्यांनी यवतमाळ व वणीवरसुद्धा दावा सांगितला आहे. यवतमाळात खुद्द पक्षाचे माजी आमदार तर वणीत रुग्णसेवेच्या बळावर एका डॉक्टरने प्रयत्न चालविले आहेत. त्यांना राष्टÑवादीच्या एका बड्या नेत्याशी असलेल्या मैत्रीचा फायदा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

लोकसभा निवडणुकीत सर्वच स्तरावर सफाया झाल्याने काँग्रेसची मंडळी अद्यापही सैरभैर आहे. लोकसभेतील पराभवानंतर ठाकरे पिता-पुत्रांचे राजकारण धोक्यात आल्याचे मानले जाते; मात्र माणिकराव ठाकरे अद्यापही यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी थेट दिल्लीतून ‘फिल्डींग’ लावत आहेत. यवतमाळ मतदारसंघात उमेदवारांची प्रचंड गर्दी असून, त्यांनी जोरदार तयारीही चालविली आहे; परंतु पालकमंत्री मदन येरावार यांना ‘आर्थिकदृष्ट्या’ फाइट देऊ शकेल असा ‘भक्कम’ उमेदवार अद्याप तरी काँग्रेसमधून पुढे आलेला नाही.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या आर्णी मतदारसंघात पक्षातूनच अचानक अर्ध्या डझनावर इच्छुक आहेत. दिग्रसमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीकडे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना आव्हान देऊ शकेल असा प्रबळ उमेदवार नाही. पुसदची जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. युतीत हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला असला तरी यावेळी भाजपकडून तो मागितला जाण्याची शक्यता आहे. वणी मतदारसंघात काँग्रेसकडून परंपरागत चेहरे तयारीत असले तरी राज्यात एकमेव निवडून आलेले चंद्रपूरचे खासदार सुरेश धानोरकर यांच्याकडून ऐनवेळी सध्या कोणत्याच पक्षात नसलेला ‘सोबर चेहरा’ रिंगणात उतरविला जाण्याची शक्यता आहे. उमरखेडमध्ये दोन-तीन नवे चेहरे इच्छुक आहेत. मात्र तेथे काँग्रेसच्या उमेदवारीची अखेरपर्यंत गुंतागुंत राहण्याची चिन्हे आहेत.

२०१४ मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय :दिग्रस : संजय राठोड (शिवसेना) । मते : १,२१,२१६, फरक ७९,८६४.सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : यवतमाळ : संतोष ढवळे (शिवसेना) - १,२३० ( विजयी - मदन येरावार, भाजप).

एकूण जागा : ७ । सध्याचे बलाबलभाजप-०५, शिवसेना-०१, राष्ट्रवादी- ०१, कॉँग्रेस-००

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019yavatmal-acयवतमाळwani-acवनीdigras-acदिग्रास