शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

शिवसेनेचे संजय राठोड अखेर कॅबिनेट मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 5:00 AM

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. यावेळी त्यांना बढती देण्याची शिवसैनिकांची मागणी होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करून सामान्य शिवसैनिकांची इच्छापूर्ती करीत त्यांच्या मागणीचा यथोचित सन्मान केला. संजय राठोड हे जिल्ह्यातून एकमेव मंत्री आहेत. शिवाय शिवसेनेचे विदर्भातील ते एकमेव मंत्री असतील. गेल्या सरकारमध्येसुद्धा ते शिवसेनेकडून मंत्रिमंडळात विदर्भातून एकमेव चेहरा होते.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारमध्ये मिळाली बढती : विदर्भातून सेनेचे दुसऱ्यांदा एकमेव मंत्री

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिग्रस मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेले शिवसेनेचे संजय दुलीचंद राठोड यांनी सोमवारी अखेर राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. संजय राठोड यांची मंत्रिमंडळात बढतीवर वर्णी लागल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळते.देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. यावेळी त्यांना बढती देण्याची शिवसैनिकांची मागणी होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करून सामान्य शिवसैनिकांची इच्छापूर्ती करीत त्यांच्या मागणीचा यथोचित सन्मान केला. संजय राठोड हे जिल्ह्यातून एकमेव मंत्री आहेत. शिवाय शिवसेनेचे विदर्भातील ते एकमेव मंत्री असतील. गेल्या सरकारमध्येसुद्धा ते शिवसेनेकडून मंत्रिमंडळात विदर्भातून एकमेव चेहरा होते.सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार असल्याने संभाव्य चेहऱ्यांना रविवारी सायंकाळीच शपथविधीसाठी तयार राहण्याबाबतचे फोन कॉल्स आले. परंतु रात्री ११ वाजूनही संजय राठोड यांना ‘मातोश्री’वरून कोणताही कॉल नसल्याने त्यांच्या समर्थकांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. परंतु अखेर रात्री १ वाजता संजय राठोड यांना शपथविधीसाठी राजभवनात पोहोचण्याचे निमंत्रण मिळाले आणि शिवसैनिकांचा जीव भांड्यात पडला. संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून सोमवारी शपथ घेताच यवतमाळात शिवसैनिकांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. त्यांच्या येथील निवासस्थानासमोरही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.संजय राठोड यांच्या निमित्ताने जिल्हा शिवसेनेत पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांनाच मिळावे ही शिवसैनिकांची मनिषा आहे. संजय राठोड यांच्याकडे आता नेमके कोणते खाते दिले जाते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वने व पर्यावरण, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क यापैकी एखादे खाते ना. राठोड यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शपथविधी सोहळ्याला संजय राठोड यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने राजभवनात उपस्थित होते. जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहे. तर शिवसेनेचा एकमेव आमदार आणि तेही कॅबिनेट मंत्री असल्याने भाजपला रोखण्याची आणि शिवसेना आणखी तळागाळापर्यंत पोहोचविण्याची, पक्षाचा विस्तार व संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत करण्याची अपेक्षा संजय राठोड यांच्याकडून शिवसैनिकांना आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे विदर्भाचे नेतृत्व करण्याची संधी संजय राठोड यांच्याकडे चालून आली आहे. फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते.परंतु नंतर त्यांच्याकडून हे पद काढून भाजपकडे दिले गेले. जिल्ह्याचे पालकमंत्री पद पुन्हा मिळविण्यासाठी त्यांनी गेल्या सरकारमध्ये बरेच प्रयत्न केले, मात्र यश आले नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पुन्हा संजय राठोड अर्थात शिवेसेनकडे येण्याची स्थिती आहे. पालकमंत्री पद मिळाल्यास शिवसेनेकडून संधी मिळेल तिथे भाजपला चेकमेट दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्याचे दोन मंत्रिपदांचे नुकसानमतदारांनी दिलेल्या कौलनुसार राज्यात ठरल्याप्रमाणे भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले असते तर जिल्ह्यात किमान तीन मंत्रीपदे मिळाली असती. त्यात दोन भाजपची व एक शिवसेनेचे मंत्री असते. परंतु शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्याचे दोन मंत्रीपदांचे नुकसान झाले आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये भाजपकडून प्राचार्य डॉ. अशोक उईके व मदन येरावार तर शिवसेनेकडून संजय राठोड हे मंत्री होते. जुन्या सरकारमध्ये एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्री असा वाटा होता. भाजप-सेनेचे नवे सरकार बसले असते तर त्यात निश्चितच मदन येरावार व संजय राठोड यांना कॅबिनेटपदी बढती मिळाली असते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये संजय राठोड यांना कॅबिनेट पदी बढती मिळाली असली तरी मंत्रिमंडळातील जिल्ह्याच्या दोन जागा मात्र कमी झाल्या आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक