पुसद : येथून जवळच असलेल्या गायमुखनगर ग्रामपंचयत हद्दीत शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी गरजवंतांना मोफत भोजन दिले जाणार आहे.
या केंद्रात गोरगरीब जनतेला मोफत भोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या या भोजनालयाअंतर्गत कमाल दररोज किमान १०० थाळ्या भोजन उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती आहे. केंद्र नियमित सुरू असणार आहे. सध्या शासन निर्देशानुसार मोफत भोजन मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.
या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गायमुखनगरचे सरपंच संदीप जंगले व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या केंद्रावर अनेक गावातील गरीब, गरजूंनी जेवणाचा आस्वाद घेतला. केंद्र चालक गणेश राठोड यांनी गावात सुविधा उपलब्ध केल्याने त्यांचे कौतुक केले.