शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 9:57 PM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुसद, उमरखेड, महागाव आणि दिग्रस येथे शोभायात्रा काढून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देशोभायात्रा : पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस येथे विविध कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतपुसद/उमरखेड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुसद, उमरखेड, महागाव आणि दिग्रस येथे शोभायात्रा काढून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेले होते. ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुसद शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८.३० वाजता शिवाजी चौकात छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्यावतीने शिवरायांना अभिवादन करण्यात आले. आमदार मनोहरराव नाईक यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्ष अनिताताई नाईक, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निलय नाईक, छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक शरद मैंद, अ‍ॅड. आशिष देशमुख, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरज डुबेवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष अखिलेश अग्रवाल, नगरसेवक निशांत बयास, महेश खडसे, वसंतराव पाटील, डॉ. भानुप्रकाश कदम, दिगांबर जगताप, शिवाजी देशमुख, माजी कुलगुरू डॉ. शेषराव सूर्यवंशी, डॉ. मोहंमद नदीम, संजय एडतकर, अभय गडम, शेख कय्युम, अ‍ॅड. उमेश चिद्दरवार, निखील चिद्दरवार यांच्यासह शेकडो नागरिकांनी अभिवादन केले. यानंतर सकाळी ९.३० वाजता शहरात प्रदूषण मुक्तीचा संदेश देणारी सायकल रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. दुपारी २ वाजतापासून शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या तालावर मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके सादर केली जात होती.उमरखेड येथे शिव जयंती उत्सव समितीच्यावतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय रुग्णालयात फळवाटप करण्यात आले. त्यानंतर सायकल स्पर्धा व मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली. दुपारी १२ वाजता उमरखेड बाजार समितीच्या प्रांगणातून शिवजयंती मिरवणुकीला प्रारंभ झाला. या शोभायात्रेतील देखावे सर्वांचे लक्ष वेधत होते. माहेश्वरी चौकात आमदार राजेंद्र नजरधने, नगराध्यक्ष नामदेव ससाने यांनी शिवप्रतिमेचे स्वागत केले. महागाव मार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार प्रकाश देवसरकर, नगराध्यक्ष नामदेव ससाने, नगर परिषद उपाध्यक्ष अरविंद भोयर, चितांगराव कदम, डॉ. विश्वनाथ विणकरे, कृष्णा देवसरकर, तातू देशमुख, राजू जयस्वाल, डॉ. विजय माने, अ‍ॅड. बाळासाहेब नाईक, गोपाल अग्रवाल, नितीन भुतडा, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश दुधेवार, निर्मला विनकरे, सविता कदम, आशा देवसरकर, वंदना वानखडे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.महागाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाला माहूर येथील योगी श्याम भारती उपस्थित होते.शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भारती यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रामराव नरवाडे, नगराध्यक्ष सुनील नरवाडे, जगदीश नरवाडे, राजू राठोड, प्रमोद भरवाडे, नारायण शिरबिरे, प्रवीण नरवाडे, साहेबराव भोयर, बाळू पाटील, मंगेश देशमुख, सतीश नरवाडे आदी उपस्थित होते.