दिग्रसमध्ये शिवसेना-काँग्रेसचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:56 PM2019-01-12T23:56:00+5:302019-01-12T23:56:42+5:30

येथील नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसच्या विभाजीत गटाने वर्चस्व प्राप्त केले.

Shivsena-Congress dominance in Digras | दिग्रसमध्ये शिवसेना-काँग्रेसचे वर्चस्व

दिग्रसमध्ये शिवसेना-काँग्रेसचे वर्चस्व

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : येथील नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत शिवसेनाकाँग्रेसच्या विभाजीत गटाने वर्चस्व प्राप्त केले.
नगरपरिषद सभागृहात सकाळी ११ वाजता निवड प्रक्रिया सुरू झाली. जयवंत देशपांडे पीठासीन अधिकारी होते. प्रथम काँग्रेसचे गटनेते म्हणून किशोर साबू यांचे नाव जाहीर होताच जावेद पहेलवान, रुस्तम पप्पूवाले, सै.अकरम यांनी आक्षेप घेतला. मात्र देशपांडे यांनी तो फेटाळून लावला. जिल्हाधिकाऱ्यांनी रुस्तम पप्पूवाले यांची काँग्रेसचे गटनेते म्हणून निवड जाहीर केली होती. मात्र या निवडीला नगरविकास मंत्रालयाने स्थगनादेश दिल्याचे सांगून पीठासीन अधिकाºयांनी आक्षेप फेटाळून लावला. यानंतर सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दहा नगरसेवकांसह काँग्रेसचे किशोर साबू, सुनंदा पांढरकर, सरला खुरसडे यांनी एकत्रीत येत सभापतिपदांवर वर्चस्व प्राप्त केले. दुपारी ३ वाजता सभापतींची निवड झाली.
बांधकाम सभापती म्हणून काँग्रेसच्या सुनंदा पांढरकर तर महिला व बालकल्याण सभापती म्हणून शिवसेनेच्या निर्मला चांदेकर व उपसभापती म्हणून काँग्रेसच्या सरला खुरसडे यांची निवड झाली. शिक्षण सभापतिपदावर रूपाली भोयर, पाणीपुरवठा सभापती म्हणून मंदाताई गाडे व आरोग्य सभापती म्हणून केतन रत्नपारखी यांची निवड झाली. तिघेही शिवसेनेचे नगरसेवक आहे. या निवडणुकीत काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले. रुस्तम पप्पूवाले यांच्या गटात जम्मन नवरंगाबादे व फातेमाबी या दोन सदस्य होत्या.
लोकशाहीचा खून
सभापती निवडीत शिवसेनेने लोकशाहीचा खून केल्याचा आरोप जावेद पहेलवान यांनी केला. ना.संजय राठोड यांना विकास कामात सहकार्य करणारे नको असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे अजिंक्य मात्रे यांनी ना.संजय राठोड यांच्या विकास कामांचा विजय असल्याचे सांगितले. एकाधिकारशाहीला कंटाळून काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंड पुकारत विकासाला सहकार्य केल्याचे मात्रे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Shivsena-Congress dominance in Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.