लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी २३ जानेवारी २०१५ पासून यवतमाळ येथे हिंदुत्व रॅली काढण्याची प्रथा सुरू केली. संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीने निघणारी शिवसैनिकांची ही एकमेव हिंदुत्व रॅली आहे.समाजाच्या सुख, दु:खात शिवसैनिक सर्वात प्रथम धावून जातो. शिवसैनिकांमधील ही संघटित शक्ती, शिस्त याचे सर्व समाजाला दर्शन व्हावे, त्यातून प्रबोधन घडावे यासाठी हिंदूत्व रॅली काढण्यास प्रारंभ करण्यात आला. पहिली तीन वर्षे केवळ यवतमाळातच भव्य अशी रॅली निघायची. शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शहर, गट, शाखा प्रमुख, युवासेना, विद्यार्थी सेना, महिला संघटक, असे जवळपास २५ हजारांवर शिवसैनिक पांढरा शुभ्र गणवेश आणि भगवा शेला या पेहरावात हिंदुत्वाचे नारे देत या रॅलीत सहभागी होत होते.कालांतराने बदलेल्या राजकीय परिस्थितीत २०१८ पासून हिंदुत्व रॅली तालुकास्तरावर काढण्यास प्रारंभ झाला. दिग्रस-दारव्हा-नेर, उमरखेड, वणी, आर्णी आदी विधानसभा मतदारसंघात तालुकास्तरीय रॅलीस शिवसैनिकांनी उत्साहात सुरुवात केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या उपक्रमाबाबत ना. संजय राठोड यांचे कौतूक केले आहे. ना. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या हिंदूत्व रॅलीची दखल 'मातोश्री'सह, शिवसेना भवन तसेच राज्यातील सर्व माध्यमांनीही घेतली आहे. आता राज्यात अनेक जिल्ह्यात २३ जानेवारीला हिंदुत्व रॅलीचे आयोजन करण्यात येते.
राज्यात केवळ यवतमाळात निघते शिवसेनेची हिंदुत्व रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 7:02 AM
शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी २३ जानेवारी २०१५ पासून यवतमाळ येथे हिंदुत्व रॅली काढण्याची प्रथा सुरू केली. संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीने निघणारी शिवसैनिकांची ही एकमेव हिंदुत्व रॅली आहे.
ठळक मुद्देसंजय राठोड यांची संकल्पना शिस्तीचे दर्शन, प्रबोधनासाठी प्रारंभ