लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात शिवशाही बस दाखल होणार असल्याने काही चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. ही बस चालविण्यास अवघड असल्याने प्रशिक्षण देण्यात आले. मात्र आता अप्रशिक्षितांनाही या बसवर पाठविले जात आहे. परिणामी त्यांच्या हातून अपघात होत आहे. म्हणूनच त्यांनी ‘आम्हाला शिवशाही बसवर पाठवू नका’ अशी विनंती केली आहे.यवतमाळ विभागात ४० ते ५० चालकांना शिवशाही बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महामंडळाच्या स्वमालकीच्या शिवशाही त्यांना चालवायच्या आहेत. या बसची लांबी इतर बसच्या तुलनेत मोठी आहे. चालविण्यासाठी जड आहे. रचना वेगळ्या प्रकारची असल्याने चालक गोंधळतात. म्हणूनच प्रशिक्षित चालकांनाच या बसवर पाठवावे असा नियम करून देण्यात आला आहे. परंतु प्रशिक्षण घेतले नसलेल्या चालकांनाही या बसवर पाठविण्यात येत आहे. वास्तविक यवतमाळ विभागात आता केवळ सात ते आठ शिवशाही (महामंडळाच्या) शिल्लक राहिल्या आहेत. ४० ते ५० चालक प्रशिक्षित असताना इतर चालकांना त्यावर पाठविण्याची सक्ती का केली जाते, हा प्रश्न आहे. महामंडळाच्या ताफ्यात खासगी लोकांच्याही शिवशाही बसेस आहेत. त्यांचे चालक फुल्ल ट्रेन आहे असे सांगितले जाते. चालकांना कामगिरी देण्यात दुजाभाव होत असल्याची ओरड आहे. मर्जीतल्या प्रशिक्षित चालकाला या कामगिरीवर पाठविले जात नाही. या सर्व बाबी प्रशिक्षण नसलेल्या चालकांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मांडल्या. त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली. अप्रशिक्षित चालकाकडून अपघाताचे प्रमाण वाढत असताना त्यांना शिवशाहीवर का पाठविले जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विभाग नियंत्रक स्ट्रिक्ट असल्याचे कामगारांमधून सांगितले जाते. शिवशाही चालक प्रकरणातही त्यांनी हीच भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे.साधारण बसेसच्या दुरावस्थेमुळेही चालक, वाहक त्रस्त झालेले आहे. मार्गात केव्हा ब्रेकडाऊन होईल याचा नेम नाही. नादुरुस्त बसेस मार्गावर नेण्यास भाग पाडले जाते. याचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे. आगार प्रमुखांनीही याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.प्रशिक्षित चालकांनाही भीतीशिवशाही चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या चालकांमध्येही कमालीची भीती आहे. प्रशिक्षण अवघे काही दिवस देण्यात आले. प्रत्यक्ष स्टेअरिंगवर बसल्यानंतर त्यांचे डेअरिंग कमी होत गेले. यामुळे प्रशिक्षण घेतलेले काही चालक जाण्यास टाळतात. मर्जीतल्या अधिकाऱ्यांकडून आपली ड्यूटी बदलवून घेण्याचा प्रयत्न सातत्याने ते करतात.
शिवशाहीवर नको म्हटले तरी सक्तीने बसवितात स्टेअरिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 6:00 AM
यवतमाळ विभागात ४० ते ५० चालकांना शिवशाही बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महामंडळाच्या स्वमालकीच्या शिवशाही त्यांना चालवायच्या आहेत. या बसची लांबी इतर बसच्या तुलनेत मोठी आहे. चालविण्यासाठी जड आहे. रचना वेगळ्या प्रकारची असल्याने चालक गोंधळतात. म्हणूनच प्रशिक्षित चालकांनाच या बसवर पाठवावे असा नियम करून देण्यात आला आहे.
ठळक मुद्देअप्रशिक्षित चालकांची व्यथा । कामगिरीतील दुजाभावामुळे त्रस्त