लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आरामदायी प्रवासासाठी, अशी गर्जना करून एसटी महामंडळाच्या ताफ्यात आणण्यात आलेल्या शिवशाही बसची प्रतिष्ठा विविध समस्यांच्या गर्दीमुळे धोक्यात आली आहे. दारे उघडी राहात असल्याने वातानुकुलीत असलेल्या या बसमध्ये बाहेरचीच हवा प्रवाशांना खावी लागत आहे. जागोजागी फुटलेल्या ठिकाणी चिकटपट्ट्या लावण्यात आल्या, तर तुटलेल्या वस्तू प्लास्टिकची दोरी बांधून सांभाळल्या जात आहे. एवढ्या सर्व गैरसोयी असताना तिकीटाच्या दराने मात्र प्रवाशांचे खिसे रिकामे होत आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्वमालकीच्या आणि काही खासगी कंपनीच्या शिवशाही बसेस आहेत. मोठ्या शहराच्या ठिकाणी या बसेस सुरुवातीला सोडल्या गेल्या. थेट प्रवाशांसाठीच चालविण्यात आल्या. मात्र तिकीटाचे दर इतर बसेसपेक्षा दीडपट असल्याने प्रवाशांनी या बसेसकडे पाठ फिरविली. काही ठिकाणच्या बसेस तर केवळ एक ते दोन प्रवासी घेऊन मार्गावर धावू लागल्या. प्रवासी मिळत नसल्याचा परिणाम म्हणून तोटा वाढत गेला. पुढे सवलतीत प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठीही ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली. शिवाय थांबेही वाढविण्यात आले. प्रवाशी शिवशाही बसकडे वळत असतानाच जाहीर करण्यात आल्याप्रमाणे सुविधा या बसमध्ये दूर गेल्या. वातानुकुलित बस असली तरी यासाठीची संपूर्ण यंत्रणा बहुतांश बसमधून हद्दपार झाली आहे. अनेक बसची दारे तुटली असल्याने लावली जात नाही. त्यामुळे वातावरणातील संपूर्ण हवा बसमध्ये शिरते. धुळीचाही मार बसतो. नियमित स्वच्छता होत नसल्याने सीटच्या बाजूचे कोपरे खºर्याच्या पिचकारीने रंगले आहे. काचा बंद राहात असल्याने दुर्गंधी सुटून जीव कासावीस होतो. सीटवरील धूळ प्रवाशांच्या कपड्यांचा रंग बदलविते. बसमधील कॅमेरे निखळून पडलेले आहेत. डिजिटल क्लॉकही बंद आहे. आतून बाहेरून घाणीने बरबटलेल्या या बसपासून आहे तेही प्रवासी दूर जात आहेत.एमएस बॉडीची बस अवघडमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अलीकडेच एमएस बॉडीची बस ताफ्यात आणली. प्रवासाकरिता ही बस अवघड असल्याची ओरड प्रवाशांमधून होत आहे. सीटचा आकार लहान असल्याने प्रवास करताना अकडते. दोन सीटच्या मध्ये असलेली जागा कमी आहे. त्यामुळे स्टँडींग प्रवाशांना अंग चोरून प्रवास करावा लागतो.
दुरावस्थेच्या गर्दीने शिवशाही ‘एसटी’ बसच्या प्रतिष्ठेला निर्माण झाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 6:00 AM
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्वमालकीच्या आणि काही खासगी कंपनीच्या शिवशाही बसेस आहेत. मोठ्या शहराच्या ठिकाणी या बसेस सुरुवातीला सोडल्या गेल्या. थेट प्रवाशांसाठीच चालविण्यात आल्या. मात्र तिकीटाचे दर इतर बसेसपेक्षा दीडपट असल्याने प्रवाशांनी या बसेसकडे पाठ फिरविली. काही ठिकाणच्या बसेस तर केवळ एक ते दोन प्रवासी घेऊन मार्गावर धावू लागल्या.
ठळक मुद्देघाणीने बरबटल्या । वातानुकुलीत प्रवासाची केवळ ‘हवा’, तिकीट दराने खिसे खाली