शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

धक्कादायक! पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 8:55 PM

शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेजारच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी तालुक्यातील मालेगाव येथे घडली.

ठळक मुद्देशेजाऱ्याच्या शेतातच लावला गळफासशेताच्या रस्त्याचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेजारच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी तालुक्यातील मालेगाव येथे घडली. गुरुवारी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली व सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडले.ज्ञानेश्वर भगवानराव कदम (२८) असे मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहिली. त्यात आपल्या आजोबाने १९५२ मध्ये दोन हेक्टर शेती खरेदी केल्याचा उल्लेख आहे. या शेतात ये-जा करण्याकरिता रस्ता होता. मात्र कालांतराने शेजारील शेतकऱ्यांनी हा रस्ता वापरण्यास मनाई केली. शेजारील शेतकरी वारंवार त्रास देत होते. माझ्या घरातील महिलांना शिवीगाळ करीत होते. एकदा तर धारदार शस्त्राने शेजारील शेतकरी आपल्या वडिलांच्या अंगावर धावून आल्याचा उल्लेखही ज्ञानेश्वरने चिठ्ठीत केला आहे. शेतात जाण्यासाठी वारंवार रस्ता मागूनही उपयोग झाला नाही. हे प्रकरण लालफितशाहीत अडकले. त्यामुळे आपल्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख ज्ञानेश्वरने चिठ्ठीत केला आहे.आपल्या मरणाची बातमी प्रसार माध्यमांनी प्रकाशित करून किमान मरणानंतर तरी आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षाही ज्ञानेश्वरने चिठ्ठीत व्यक्त केली. तसेच कुटुंबातील सर्वांची माफी मागून मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. दरम्यान, आत्महत्येनंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांनी प्रथम नकार दिला होता. मात्र त्यानंतर समजूत काढली गेल्याने त्यांनी गुरुवारी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी कदम यांच्या कुटुंबातील कुणीही तक्रार दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.ज्ञानेश्वर कदम यांच्याजवळ पंतप्रधान, मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी आढळली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.- एम. एम. बोडखेठाणेदार, उमरखेड

टॅग्स :Suicideआत्महत्याfarmer suicideशेतकरी आत्महत्या