लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव/फुलसावंगी : तीन दुकानांसह एका गोदामाला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे घडली. आगीत सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे, दुकानात चोरी करून आग लावल्याची तक्रार व्यापाºयांनी महागाव पोलीस ठाण्यात दिली आहे.फुलसावंगीतील पुनेश्वर टेकडी परिसरातील नाईक कॉम्प्लेक्समधील दुकानाला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. यात प्रफुल्ल नारायण अमिलकंठवार यांचे किराणा दुकान, कपिल विनायक भडंगे यांचे ईलेक्ट्रॉनिक व जनरल स्टोअर्स, शेख असलम शेख आयनू यांचे किराणा दुकान व गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीत सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तलाठ्याने महागाव तहसीलदारांना दिला. त्यात शेख शेख असलम शेख आयनू यांचे २५ लाख, नारायण अमिलकंठवार यांचे २० लाख तर कपील भडंगे यांचे १५ लाख रुपये नुकसान झाल्याचे म्हटले आहे.दरम्यान, या तीनही व्यापाºयांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यात अज्ञात इसमाने दुकानात चोरी करून आग लावल्याचे म्हटले आहे. रात्री १.३० वाजता माहिती मिळताच दुकानदारांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा दुकानातील वस्तूंची फेकाफेक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच पेट्रोल टाकून दुकान जाळल्याचा आरोप केला आहे. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागण्याचा प्रश्नच नाही. कारण गत महिनाभरापासून वीजपुरवठा खंडित असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. संबंधितांवर कारवाई करावी, असेही म्हटले आहे.
फुलसावंगीत दुकाने भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 2:09 AM
तीन दुकानांसह एका गोदामाला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे घडली.
ठळक मुद्दे६० लाखांचे नुकसान : चोरी करून आग लावल्याचा व्यापाºयांचा आरोप