विठ्ठल कांबळे ।आॅनलाईन लोकमतघाटंजी : तालुक्यातील मांडवा येथील नवदाम्पत्याने लग्न घटिकेपूर्वी स्वत:च्या घरी शोषखड्डा खणून पाण्याचे जीवनातील महत्त्व गावकरी आणि वऱ्हाड्यांना पटवून दिले.उन्हाळ्यात शहरी असो किंवा ग्रामीण भाग, पाण्याने कासावीस होतो. नागरिक पाण्याच्या समस्येने हैराण झालेले असतात. यावर्षी तर जिल्ह्यातच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे सर्वत्र पाण्याची समस्या आहे. मात्र ही समस्या दूर करण्यासाठी मांडवा येथील नवदाम्पत्याने पुढाकार घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. शनिवारी तालुक्यातील मांडवा येथे अंकुश विठ्ठल मडावी यांचा संगिता राजेंद्र बुरगाटे रा.बोथली ता.आर्वी जि.वर्धा यांच्याशी विवाह ठरला होता. ठरल्याप्रमाणे मंगलाष्टक पार पडताच या नवदाम्पत्याने थेट घर गाठले. तेथे शोषखड्ड्याच्या कामाला प्रारंभ केला.मंगलाष्टकानंतर सुलग्न, अशी सर्वत्र पद्धत असते. मात्र अंकुश आणि संगिता यांनी या परंपरेला फाटा देत समाजोपयोगी कार्याला प्राधान्य दिले. त्यांनी मंगलाष्टक होताच वैवाहिक आयुष्यातिल पहिले पाऊल गावाच्या विकासाकरिता उचलले. आधीच ठरविल्याप्रमाणे या नवदाम्पत्याने गावात राबविल्या जात असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमाअंतर्गत स्वत:च्या घरी शोषखड्डा खोदला. त्यांनी पाण्याचे जीवनातील महत्त्व कृतीतून गावकरी व पाहुण्यांना पटवून दिले. याप्रसंगी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे तालुका सचिव प्रदीप रंदये, विजय झाडे, विकेश शेंडे, हेमेंद्र राऊत, निशांत सावसाकडे, वृंदा घोडमारे, बबिता सावसाकडे, गायत्री सावसाकडे, अनिल जांभुळे, शिवाणी आंबेकर, रामचंद्र मडावी, विठ्ठल मडावी, प्रभुदास सिबले, मंगेश मंगरे व पाहुणे उपस्थित होते. गावकºयांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
मंगलाष्टकं संपताच घरी खणला शोषखड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:04 PM
तालुक्यातील मांडवा येथील नवदाम्पत्याने लग्न घटिकेपूर्वी स्वत:च्या घरी शोषखड्डा खणून पाण्याचे जीवनातील महत्त्व गावकरी आणि वऱ्हाड्यांना पटवून दिले.
ठळक मुद्देमांडवाचे नवदाम्पत्य : युवकांपुढे निर्माण केला आदर्श, गावकऱ्यांनी केले कौतुक