यवतमाळ : शौर्य दिनानिमित्त भिमा कोरेगाव क्रांतिस्तंभास माजी सैनिकांनी मानवंदना दिली. स्थानिक बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळास्थळी भिमा कोरेगाव क्रांतिस्तंभ प्रतिकृतीला शौर्य दिन समितीच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. महार रेजिमेंटच्यावतीने माजी सुभेदार बी.ए. खडसे, राष्ट्रपती पदक विजेता व माजी सुभेदार गौतम सोनवणे यांनी शौर्यस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली. यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. प्रसंगी माजी सैनिक, वीर पत्नी यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. नाईक यशवंत मेश्राम, माजी हवालदार ओमप्रकाश फुलमाळी, माजी सुभेदार अशोक कांबळे, नायक संजय अंभोरे, हवालदार प्रवीण इंगोले, अर्जून लोखंडे, चिन्मय विश्वास, सुभेदार ज्ञानेश्वर अभ्यंकर, संतोष कुमार, शिवाजी गुस्ते, नायक सिद्धार्थ वाघमारे, वीरपत्नी सुनीता प्रकाश विहिरे, हवालदार सुभाष शंभरकर, सुरेश नगराळे, प्रल्हाद देशभ्रतार, विजय मेश्राम, सिद्धार्थ नगराळे, वीरपत्नी माधुरी वाळके यांचा सत्कारमूर्तींमध्ये समावेश आहे. संचालन भारत वनकर व युवराज मेश्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष जगन्नाथ सिरसाठ, उपाध्यक्ष जितेंद्र खोब्रागडे, अवधुत भोंगाडे, सचिव सुमेध भगत, सहसचिव आनंद मेश्राम, कोषाध्यक्ष संतोष मोरे, प्रसिद्धी प्रमुख डॉ. श्रीकांत पठाडे, हर्षवर्धन खोब्रागडे, के.एस. नाईक, प्रा.डॉ. सुभाष डोंगरे, रणधीर, खोब्रागडे, बाळासाहेब चिमूरकर, गोपाळ देठे, नामदेव मडावी, कैलास बोरकर, नारायण थूल, प्रा. के.डी. भगत, पुरुषोत्तम भजगवरे, सुभाष मनवर, हरिदास गघम, धर्मराज गणवीर, सिद्धेश्वर गुजर, गुणवंत मोटघरे, रवी श्रीरामे, कृष्णा परिपगार, डी.के. हनवते, अनिल मून, विष्णू भितकर, रमा कांबळे, माया गजभिये, ए.पी. भगत, रवींद्र शंभरकर, पराग मेश्राम, अनिचल मेश्राम, राहुल खडसे, विजय भिले, अशोक इंगोले, दीपक रामटेके आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)
शौर्यदिनी भिमा कोरेगाव क्रांतिस्तंभास मानवंदना
By admin | Published: January 07, 2016 3:08 AM