लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शौचालयासाठी आपल्या पित्यासोबत बंड पुकारणाऱ्या इंद्रठाना येथील चिमुकलीला पडद्यामागची स्वच्छतादूत म्हणून यवतमाळ येथे प्रजासत्ताकदिनी सम्मानित केले. स्वच्छतेसाठी मोलाचे कार्य करणाऱ्या पडद्यामागच्या स्वच्छतादूतांचा पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलाज शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यात इंद्रठाना येथील श्वेता पंडित रंगारी हिचाही समावेश आहे.वडील जोपर्यंत घरी शौचालय बांधणार नाही, तोपर्यंत शाळेत येणार नाही, असे श्वेताने शिक्षकांना सांगितले. आपण शाळेतून सुटी काढल्याचे श्वेताने घरी येऊन वडिलांना सांगितले. वडिलांनी तिला खूप समजाविले. परंतु एकले नाही. मुलीच्या बंडासमोर पित्यानेही हार पत्करली. अडचणीतून मार्ग काढत पित्याने शौचालयाची निर्मिती केली. मुख्यमंत्री स्वच्छता दूत राजू कंद्रे यांनी गावात ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट दाखविला होता. याचा प्रभाव पडल्याने श्वेताने वडिलांकडे शौचालय बांधण्याचा आग्रह धरला होता.
पडद्यामागची स्वच्छतादूत श्वेता रंगारी सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 9:47 PM