लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाहनांच्या गर्दीचा त्रास होत असल्याने धामणगाव (रेल्वे) येथे स्टेशनजवळ एसटी बस थांब्याला तेथील नागरिकांकडून प्रचंड विरोध केला जात आहे. हा थांबा बंद झाल्यास प्रवाशांची एक किलोमीटर पायपीट होणार आहे. यात प्रशासन काय भूमिका घेते याकडे प्रामुख्याने यवतमाळसह या मार्गावर असलेल्या गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. यवतमाळ ते धामणगाव दररोज दीड हजारावर नागरिक प्रवास करतात. यात प्रामुख्याने रेल्वे प्रवाशांची संख्या अधिक आहे.धामणगाव रेल्वेसाठी यवतमाळ आगाराच्या दररोज शंभरहून अधिक फेºया आहेत. या सर्व बसेस मागील ४० वर्षांपासून धामणगाव रेल्वे स्टेशनपर्यंत जातात. तेथेच प्रवासी उतरवितात आणि घेतातही. धामणगाव एसटी स्थानकापासून रेल्वे स्टेशन अर्धा ते पाऊन किलोमीटर दूर आहे. प्रवाशांची पायपीट थांबावी आणि त्यांना आॅटोरिक्षा किंवा इतर भाड्याचा भुर्दंड बसू नये यासाठी या बसेस रेल्वे स्टेशनजवळ प्रवाशांची चढ उतार करतात.रेल्वे स्टेशनजवळ वाहनांची वर्दळ वाढली आहे. प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांसह इतर प्रकारच्या वाहनांची याठिकाणी गर्दी होत आहे. बसेस वळविण्याचा मार्गही बदलवून नागरी वस्तीतून करण्यात आला. या सर्व प्रकाराने वाढलेला त्रास आणि अपघाताची भीती व्यक्त करत धामणगावातील नागरिकांनी रेल्वे स्टेशनजवळ बस थांबविण्यास विरोध चालविला आहे. काही वर्षांपूर्वीही हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी ‘एसटी’ने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी रेल्वे स्टेशनजवळ बसेस थांबविण्याच्या बाजूने निर्णय झाला होता. आता मात्र पुन्हा हा प्रश्न पुढे आला आहे.रेल्वे स्टेशन जवळ प्रवाशांची चढ उतार बंद झाल्यास नागरिकांची गैरसोय वाढणार आहे. त्रास होत असल्याने रेल्वे स्टेशनजवळ प्रवाशांची चढ उतर थांबवावी ही धामणगावातील नागरिकांची मागणी आहे. दुसरीकडे प्रवाशांची पायपीट वाढणार आहे. अशावेळी संबंधित प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.खासगी वाहनधारकांडून नियमाचे उल्लंघनयवतमाळ-धामणगाव मार्गावर काही खासगी प्रवासी वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. तालुका परवाना असलेली वाहने जिल्ह्याच्या सीमा ओलांडत आहे. अमरावती पासिंगची वाहने यवतमाळात तर यवतमाळ पासिंगची वाहने धामणगावातून चालविली जात आहे. या वाहनांद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे धामणगाव रेल्वे स्टेशनजवळून आणि बसस्थानकापासूनच प्रवासी घेतले जातात. या प्रकाराकडे पोलीस आणि परिवहन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष सुरू आहे. यवतमाळ आणि धामणगाव पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशीही मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.
रेल्वे प्रवाशांची पायपीट वाढण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:36 PM
वाहनांच्या गर्दीचा त्रास होत असल्याने धामणगाव (रेल्वे) येथे स्टेशनजवळ एसटी बस थांब्याला तेथील नागरिकांकडून प्रचंड विरोध केला जात आहे. हा थांबा बंद झाल्यास प्रवाशांची एक किलोमीटर पायपीट होणार आहे.
ठळक मुद्देस्टेशनजवळ बसथांब्याला विरोध : यवतमाळ येथून धामणगावसाठी एसटीच्या दररोज शंभर फेऱ्या