लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : तालुक्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव न झाल्याने सध्या रेतीला सोन्याचे भाव आले आहे. याचा फायदा घेण्यासाठी रेती तस्कर चोरट्या मार्गाने चढ्या दरात रेती विकत आहे. त्यामुळे सध्या रेती तस्करांची चांदी असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात १६ रेती घाटांची लिलाव प्रक्रिया झाली असली तरी मारेगाव तालुक्यातील एकाही रेती घाटाचा अद्यापही लिलाव झाला नाही. आगामी लोकसभा निवडणुका व आचारसंहिता बघता भविष्यात रेती घाट लिलाव होण्याची आशा धुसर झाली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आता चढ्या दराने रेती खरेदी करीत आहे. याचाच फायदा रेती तस्करांनी उचलायला सुरूवात केली आहे. महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहून तस्करांनी तालुक्यातील नाले व नद्यातील रेती चोरट्या मार्गाने उचलणे सुरू केले आहे.सध्या एका ट्रॅक्टरला साडेसहा हजार ते सात हजार रूपये भाव आहे. महसूल प्रशासनाने रेती तस्करीवर पायबंद घालून तालुक्यातील रेतीघाटाचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.
मारेगावात रेती तस्करांची चांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 9:53 PM
तालुक्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव न झाल्याने सध्या रेतीला सोन्याचे भाव आले आहे. याचा फायदा घेण्यासाठी रेती तस्कर चोरट्या मार्गाने चढ्या दरात रेती विकत आहे. त्यामुळे सध्या रेती तस्करांची चांदी असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देदामदुप्पटीने विक्री : प्रशासन निवडणुकीत व्यस्त असल्याचा फायदा