शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

‘सरल’चा आर्थिक भुर्दंड शिक्षकांना

By admin | Published: September 19, 2015 2:29 AM

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘सरल’ योजनेंतर्गत शाळांची सर्व माहिती आॅनलाईन भरण्याचे आदेश आहेत.

मुख्याध्यापकांनाही फटका : आॅनलाईन वेतनासाठी वसुलीयवतमाळ : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘सरल’ योजनेंतर्गत शाळांची सर्व माहिती आॅनलाईन भरण्याचे आदेश आहेत. मात्र यासाठी शासकीय यंत्रणा उपलब्ध नाही. परिणामी शिक्षकांनाच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागता. याआधी शालांत प्रणालीसाठी शिक्षकांकडून रक्कम घेण्यात आली. महिन्यात एक तारखेला आॅनलाईन वेतन झाले नसले तरी प्रत्येक शाळेकडून २०० रुपये वसूल करण्यात आले. याचा फटकाही मुख्याध्यापकांनाच बसत आहे. शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘सरल’ योजनेंतर्गत माहिती भरण्यासाठी शासनाने शासकीय यंत्रणा उभारावी आणि त्या यंत्रणेद्वारेच शाळांनी माहिती भरावी, असे सांगून कुठल्याही परिस्थितीत खासगी यंत्रणेकडून माहिती भरू नये, अशी सूचना दिली आहे. असे असतानाही जिल्ह्यात विद्यार्थ्यांची माहिती भरण्याकरिता ५ ते १४ सप्टेंबर हा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत कुठलीच शासकीय यंत्रणा उपलब्ध न केल्याने शाळांनी खासगी यंत्रणेकडून माहिती भरली. या माहितीचे दर प्रती विद्यार्थी दहा रुपये याप्रमाणे जिल्ह्यातील पाच लाख ४५ हजार विद्यार्थ्यांसाठीचे ५५ लाख रुपये खासगी यंत्रणेने शिक्षकांकडून घेतले. शिक्षकांचे दर प्रती शिक्षक २०० प्रमाणे १५ हजार शिक्षकांचे ३० लाख रुपये, तर प्रती शाळा ५०० रुपये याप्रमाणे तीन हजार शाळांचे १५ लाख रुपये खासगी यंत्रणेला मिळाले आहे. एकंदरीत एक कोटी रुपयांचा भुर्दंड शिक्षकांवर पडला आहे. या अगोदरच शालार्थ प्रणालीमुळे शिक्षक रक्कम देऊन बेजार झाले आहेत. एकाही महिन्यात एक तारखेला आॅनलाईन वेतन झाले नसले तरी प्रती शाळा २०० रुपये वसुली सुरू आहे. याचाही आर्थिक भार मुख्याध्यापकांना सहन करावा लागत असल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व माहिती भरण्यासाठी तत्काळ शासकीय यंत्रणा उभारावी आणि ‘सरल’साठी शिक्षकांनी दिलेले पैसे परत करावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांनी केली आहे. (वार्ताहर)