शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

एसटीत बसा अन् सिनेमा पाहा, गाणीही ऐका !

By admin | Published: May 23, 2017 1:18 AM

खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी आता परिवहन महामंडळाने आधुनिक शक्कल लढविली आहे.

प्रवासी खेचण्याचा प्रयोग : जिल्ह्यातील १३४ बसेसमध्ये वायफाय सुविधाअविनाश साबापुरे । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी आता परिवहन महामंडळाने आधुनिक शक्कल लढविली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल १३४ बसेसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते कितीही खडबडीत असले आणि भंगार बसेसचा कितीही खडखडाट असला तरी, प्रवाशांना मोबाईलवर सिनेमा पाहायला मिळणार आहे.. अगदी फुकटात!महामंडळाच्या बसेसकडे प्रवाशांचा ओढा वाढविण्यासाठी हा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून करण्यात आला आहे. यंत्र मीडिया सर्विसेसच्या माध्यमातून महामंडळाने एसटी बसेसमध्ये वायफाय सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. १ ते १८ मेपर्यंत जिल्ह्यातील १३४ बसेसमध्ये वायफायचे छोटे उपकरण बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात यवतमाळ आगाराच्या ६२, दारव्हा आगाराच्या ३०, नेर आगाराच्या २५ आणि राळेगाव आगाराच्या १७ बसेसचा समावेश आहे. तर उर्वरित ५ आगारांच्या बसेसमध्येही हे काम लवकरच केले जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने जिल्ह्यातील सर्वच ५१० बसेसमध्ये वायफाय देण्यात येणार आहे. सध्या ज्या १३४ गाड्यांमध्ये वायफाय देण्यात आले, त्यातील बहुतांश बसफेऱ्या या अमरावती, नागपूर, नांदेड, पुणे, औरंगाबाद अशा लांब आणि मध्यम पल्ल्याच्या आहेत. मात्र, पुढील टप्प्यात जिल्ह्यांतर्गत ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांमध्येही वायफाय देण्यात येणार आहे. एसटीत असे वापरा वायफायबस चालकाच्या बाजूने वायफायचे उपकरण बसविण्यात आले आहे. एसटीत चढता क्षणी प्रवाशाच्या मोबाईलवर वायफायचे ‘किवी’ हे आॅप्शन अ‍ॅक्टिवेट होईल. त्याला क्लिक करून आपला मोबाईल क्रमांक भरताच प्रवाशाचा मोबाईल वायफायशी कनेक्ट होईल. परंतु, जाणकारांच्या मते, हे वायफाय नसून हॉटस्पॉटचा प्रकार आहे. त्यामुळे अनलिमिटेड इंटरनेट सुविधा किंवा डाउनलोडिंगची सुविधा मिळणार नाही. केवळ महामंडळाने आधीच स्टोअर करून ठेवलेले सिनेमे आणि गाणी प्रवाशांना पाहता-ऐकता येईल. बसस्थानकावर वायफाय दिल्यास ‘अनपेक्षित’ गर्दी वाढून सामान्य प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रवाशांकडून मागणी आल्यास बसस्थानकावरही निश्चितच वायफाय देण्यात येईल.- मुक्तेश्वर जोशी, विभागीय वाहतूक अधिकारी, यवतमाळ