जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी कोविड लस घेण्याकरिता आलेल्या रुग्णांची विचारपूस केली. रुग्णालयात सोयीसुविधांची पाहणी केली. पारवा येथील कोविड रुग्णांसाठी नवीन कोविड सेंटर उभारणीकरिता जिल्हा परिषद शाळा परिसर व शासकीय आश्रमशाळा जांब येथील परिसराची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपविभागीय अधिकारी विवेक जाॅन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरि पवार, तहसीलदार पूजा माटोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, डॉ. संजय पुराम, नायब तहसीलदार माला गेडाम, माजी सभापती रूपेश कल्यामवार, गणेश मुद्दलवार, संजय आरेवार, उपसरपंच अर्जुन आत्राम, अरुण कांबळे, भालचंद्र नांदेकर, मनोज करपते, ठाणेदार गोरख चौधर, जमादार रमेश बंडीवार, मंडल अधिकारी बेलसरे, तलाठी, ग्रामसेवक, आशा सेविका व पारवा आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.