शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

यवतमाळ जिल्ह्यातील जंगलात सहा शिकारी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:45 PM

वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील वडगाव परिसरातील जंगलात शिरलेल्या सहा शिकाऱ्यांना वन विभागाने मोठ्या शिताफीने शनिवारी पहाटे जेरबंद केले.

ठळक मुद्देशिकाऱ्यांसोबत झालेल्या झटापटीत दोन वन अधिकारी जखमीरायफल, जिवंत काडतूस, सत्तूर, चाकू आणि कार जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील वडगाव परिसरातील जंगलात शिरलेल्या सहा शिकाऱ्यांना वन विभागाने मोठ्या शिताफीने शनिवारी पहाटे जेरबंद केले. शिकाऱ्यांसोबत झालेल्या झटापटीत दोन वन अधिकारी जखमी झाले. या शिकाऱ्यांजवळून रायफल, काडतूसे, सत्तूर, चाकू आणि कार जप्त करण्यात आली.दिग्रसपासून २० किलोमीटर अंतरावर वडगाव आहे. या परिसरातील जंगलात शिकारी शिरल्याची माहिती दिग्रसचे वन परिक्षेत्र अधिकारी आनंद धोत्रे यांना मिळाली. रात्रीच ते पथकासह जंगलात गेले. त्यावेळी त्यांना तीन वेळा बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज आला. त्यांनी पथकासह आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा सहा शिकारी शिकार करण्याच्या तयारीत होते. या सशस्त्र शिकाऱ्यांवर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झडप घातली. त्यावेळी झालेल्या झटापटीत क्षेत्र सहायक गुलशर खान रहीम खान पठाण यांच्या छातीला शिकाऱ्याच्या हातातील सत्तूर लागला. तसेच वनरक्षक अश्विन मुजमुले जखमी झाले. जखमी अवस्थेतही सहा शिकाऱ्यांना जेरबंद करण्यात आले. निसार अजगर अली तंवर, शे. हुसेन शे. मेहबूब, म.सलीम हाजी अयुब तिघे रा. सावळी सदोबा व म. फारुक पारेख, म.हसीन अ. रज्जाक, शेख साजीद शेख गुलाम तिघे रा. कलगाव ता. दिग्रस यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळून एक रायफल, दोन काडतूस, दोन सत्तूर, दोन चाकू, सहा मोबाईल, एक कार, तीन दुचाकी जप्त करण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक भगवान पायघणे यांनी दिग्रसकडे धाव घेतली. ही कामगिरी क्षेत्र सहायक प्रकाश जाधव, अनिल सोनोने, वनपाल मोफीक अहेमद, संतोष जाधव, वनरक्षक गौतम बरडे, संतोष बदुकले, अनिल इंगोले, अयुब पठाण, अनिल राठोड, आमीर पठाण यांनी केली.

टॅग्स :forestजंगलCrimeगुन्हा