शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

शिवसेनेचे सहा तर काँग्रेसचे पाच सभापती

By admin | Published: March 15, 2017 12:08 AM

१६ पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदासाठी मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने ...

पंचायत समिती : भाजपाला तीन जागांवर रोखले, राष्ट्रवादीकडे एक, तीन ठिकाणी ईश्वरचिठ्ठी, क्रॉस कनेक्शनची धूम यवतमाळ : १६ पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदासाठी मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक सहा जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले. सेनेच्याच बरोबरीने काँग्रेसने तब्बल पाच पंचायत समित्या पटकावल्या. सत्तेचा सर्वाधिक फौजफाटा असलेल्या भाजपाला मात्र केवळ तीन पंचायत समित्यांवर आपला सभापती निवडून आणता आला. राष्ट्रवादीला आपल्या बालेकिल्यातील केवळ पुसद ही एकमेव पंचायत समिती राखता आली. पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत अनेक ठिकाणी क्रॉस कनेक्शन पाहायला मिळाले. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चारही पक्ष अनेक ठिकाणी कुठे एकमेकांच्या विरोधात तर कुठे साथीला होते. विशेष असे, परंपरागत भाजप-शिवसेना युती केंद्रात व राज्यात सत्तेत असली तरी पंचायत समित्यांच्या या निवडणुकीत हे दोनही पक्ष कुठेच एकत्र बसले नाहीत. शिवसेनेने तर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले. सर्वाधिक सहा पंचायत समित्यांमध्ये आपल्या पक्षाचा सभापती बसवून शिवसेनेने तेथे भगवा फडकविला. सेनेला उपसभापतिपदाच्याही तेवढ्याच जागा मिळाल्या. काँग्रेसला पाच सभापती तर तीन उपसभापती मिळविता आले. भाजपाला तीन सभापती बसविण्यात यश आले. बाभूळगाव येथील सभापतीची जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित होती. परंतु या संवर्गातून एकही उमेदवार नसल्याने ही जागा रिक्त राहिली. तेथे उपसभापतिपद भाजपाकडे आहे. आता तेथे नव्याने सभापतिपदाचे आरक्षण काढले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले आहे. मात्र तेथे हे नवे आरक्षण लांबणीवर टाकून उपसभापतीलाच प्रभारी सभापती म्हणून ट्रिट करण्याची राजकीय खेळी भाजपाकडून खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रभारी सभापतीच्या निमित्ताने भाजपाला चार पंचायत समित्या मिळाल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बालेकिल्यातील पुसद ही एकमेव समिती राखता आली. दोन जागांवर या पक्षाचे उपसभापती निवडून आले. पंचायत समित्यांमधील संख्याबळ पाहता अनेक ठिकाणी परंपरागत भाजपा-शिवसेना युती होवून या पक्षांना अधिकाधिक पंचायत समित्या आपल्याकडे राखता आल्या असत्या. मात्र या युतीत पालकमंत्रिपदाचे राजकारण शिरल्याने ही युती १६ पैकी कोणत्याही पंचायत समितीत दिसून आली नाही. उलट शक्य असेल तेथे शिवसेनेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुठे काँग्रेस तर कुठे राष्ट्रवादीची मदत घेतली. मग भाजपानेही शिवसेनेवर अवलंबून न राहता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या साथीने आपले सभापती-उपसभापती बनविण्याचा प्रयत्न केला. या क्रॉस कनेक्शनच्या बळावर भाजपाने तीन सभापती व चार उपसभापती बनविले. दिग्रस, उमरखेड व राळेगाव येथे समसमान जागांमुळे ईश्वरचिठ्ठी काढावी लागली. त्यातही शिवसेनेचीच सरशी झाली. दिग्रस व उमरखेड येथे ईश्वरचिठ्ठीने शिवसेनेला कौल दिला. राळेगावमध्ये काँग्रेसचा सभापती ईश्वरचिठ्ठीने निवडून आला.