शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘एसटी’च्या सेवानिवृत्तांना आता दोन ऐवजी सहा महिने मोफत प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 3:01 PM

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता सहा महिने मोफत प्रवास करता येणार आहे. यापूर्वी केवळ दोन महिन्याची पास दिली जात होती.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता सहा महिने मोफत प्रवास करता येणार.मोफत प्रवासाचे चार महिने वाढवून सहा महिने करण्यात आले आहे. बारमाही मोफत प्रवास पास मिळावी यासाठी सेवानिवृत्तांनी लढा उभारला होता. 

विलास गावंडे 

यवतमाळ - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता सहा महिने मोफत प्रवास करता येणार आहे. यापूर्वी केवळ दोन महिन्याची पास दिली जात होती. आता मोफत प्रवासाचे चार महिने वाढवून सहा महिने करण्यात आले आहे. बारमाही मोफत प्रवास पास मिळावी यासाठी सेवानिवृत्तांनी लढा उभारला होता. 

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी 1 जून 2018 रोजी कामगारांना वेतनवाढीसोबतच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मोफत पासची मुदत सहा महिने करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. मात्र परिपत्रक जाहीर झाल्याशिवाय योजनेची अंमलबजावणी होत नाही. आता महाव्यवस्थापक माधव काळे यांनी मोफत पासचे परिपत्रक जाहीर केल्याने राज्यभरातील 43 हजार सेवानिवृत्तांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले, ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेले, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी सहा महिन्यासाठी मोफत प्रवास पास दिली जाणार आहे. मात्र जुलै ते फेबु्रवारी या कालावधीसाठीच ही पास असणार आहे. शिवाय साध्या बसमधूनच प्रवास करता येणार आहे. निमआराम गाडीतील भाड्याचा फरक भरून दिल्यास या बसमधून प्रवास करता येणार आहे. एका बसमध्ये दोन पासधारकांनाच एंट्री मिळणार आहे. सेवानिवृत्त कर्मचारी व पती किंवा पत्नी अशा दोघांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नात्यातील इतर कुठल्याही व्यक्तीने प्रवासाचा पयत्न केल्यास पास जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

दुसरा पास मिळणार नाही

लाभधारकांना मोफत पासची चांगली जपणूक करावी लागणार आहे. एकदा दिलेला पास खराब किंवा गहाळ झाल्यास त्या वर्षाच्या उर्वरित काळासाठी दुसरा पास दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अपघातप्रसंगी इतर प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीही पासधारकांना नियमानुसार दिल्या जाणार आहे. मोफत पासमुळे सेवानिवृत्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सेवानिवृत्तांच्या मोफत पासचा कालावधी वाढवून मिळावा यासाठी मागील 13 वर्षांपासून लढा उभारण्यात आला आहे. महामंडळाने चार महिने कालावधी वाढविला. बारमाही मोफत प्रवास पासची आमची मागणी होती. चार महिने वाढल्याने आम्ही समाधानी आहोत.

- भास्कर भानारकर, अध्यक्ष, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळ