शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
2
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
3
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
4
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
5
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
6
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
7
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
8
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
9
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
10
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
11
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
12
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
13
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
14
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
15
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
16
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
17
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
18
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
19
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
20
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

युवक काँग्रेसच्या सहा विधानसभा अध्यक्षांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:25 PM

जिल्हा युवक काँग्रेसच्या सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. त्याची मतमोजणी करून निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल राऊत विजयी झाले. पुसद विधानसभा मतदारसंघासाठी मतदान न घेता थेट नियुक्त्या केल्या जाईल.

ठळक मुद्देजिल्हाध्यक्षपदी अतुल राऊत : पहिल्यांदाच वादाशिवाय निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा युवक काँग्रेसच्या सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. त्याची मतमोजणी करून निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल राऊत विजयी झाले. पुसद विधानसभा मतदारसंघासाठी मतदान न घेता थेट नियुक्त्या केल्या जाईल.जिल्हा युवक काँग्रेसच्या निवडणुकीत पहिल्यांदा गटातटाचा वाद न होऊ देता पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षासह सहा विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. एनएसयुआयच्या निवडणुकीत प्रचंड गटबाजी झाली होती. त्यामुळे युवकच्या निवडणूकीवर सुरूवातीपासूनच नेते मंडळींचा वॉच होता. मागील आठवड्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात झाली. यावेळी विजयी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.युवक काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून अतुल राऊत विजयी झाले. उपाध्यक्ष म्हणून तालिब शेख, प्रमोद बगाडे, आकाश आत्राम, महासचिव अतुल राठोड, सागर डंभारे, व्यंकटरमण एल्टीवार, आमीन शेख, भगवान पंडागडे, वैभव जवादे विजयी झाले.उमरखेड विधानसभा अध्यक्ष इम्रान पठाण, उपाध्यक्ष निरंजन चव्हाण, महासचिव सोनू खतीब, शहाबुद्धीन, सलमा पिंजारी, शिवाजी वानखडे, राहुल वानखडे विजयी झाले. दिग्रस विधानसभा अध्यक्ष नंदू ठाकरे, उपाध्यक्ष सागर तिमाणे, महासचिव अमोल गुघाणे, इम्रान शेख, आकाश चिरडे, राहुल इंगोले, पवन जाधव यांची निवड झाली. राळेगाव विधानसभा अध्यक्ष म्हणून वसीम पठाण, उपाध्यक्ष चंद्रशेखर परचाके, महासचिव अमोल मेश्राम, कुणाल पंचबुध्दे यांची निवड झाली. आर्णी विधानसभाअध्यक्ष म्हणून अतुल देशमुख यांची निवड झाली.या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर स्थानिक नेतेपुत्रांचाच दबदबा कायम असल्याचे दिसून येते. वणी, आर्णी, यवतमाळमध्ये अपेक्षितच निकाल लागले. जिल्हाध्यक्षपदी ठरल्याप्रमाणे अतुल राऊत निवडून आले. ही संपूर्ण निवडणूक राहुल माणिकराव ठाकरे व जितेंद्र शिवाजीराव मोघे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.यवतमाळ अध्यक्षपदी विक्की राऊतयवतमाळ विधानसभा अध्यक्षपदी अमेय उर्फ विक्की राऊत, उपाध्यक्ष राजीक पटेल, महासचिव गजानन पायघन, राजवर्धन गाडे, वासिक अली यांची निवड झाली.वणी विधानसभा अध्यक्षपदी प्रदीप तोटावारवणी विधानसभा अध्यक्ष प्रदीप तोटावार, उपाध्यक्ष सचिन टाले, महासचिव रोहित राऊत, चंद्रशेखर बोनीवार, आकाश किन्हाके, छगण भोयर, रहीम शेख यांची निवड झाली.

टॅग्स :congressकाँग्रेस