यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात यंत्र अभियांत्रिकी विभागातर्फे कौशल्य विकास शिबिर घेण्यात आले. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणेचे विभाग प्रमुख डॉ. सी.एम. सेवतकर लाभले होते. माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी डॉ. सेवतकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. अतुल बोराडे यांनी कौशल्य विकास शिबिराचा हेतू आणि या शिबिरात होणाऱ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची माहिती प्रास्ताविकातून दिली. सध्याच्या स्पर्धात्मक युगात अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती घेवून ती आपल्या विद्यार्थ्यांना अवगत करून देणे, जेणेकरून तो कुठेही मागे पडणार नाही या हेतूने महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेले हे कौशल्य विकास शिबिर हा स्तुत्य उपक्रम आहे, असे डॉ. सी.एम. सेवतकर यांनी यावेळी सांगितले. ‘हिट ट्रान्सफर अँड फ्लूड फ्लो’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. शिबिरार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन यावेळी करण्यात आले. संचालन प्रा. सागर जिरापुरे यांनी, तर आभार डॉ. पंकज श्रीराव यांनी मानले. यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. सचिन भालेराव, प्रा. संदीप कदम यांच्यासह यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)
‘जेडीआयईटी’त कौशल्य विकास शिबिर
By admin | Published: May 03, 2017 12:12 AM