लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : कळंब-राळेगाव-वडकी या ५० किलोमीटर परिसरात सिमेंट रोड बांधले जाणार आहे. यासाठी रुंदीकरणाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या मधात येणारी जवळपास अडीच हजार वृक्षांची गेल्या १५ दिवसांपासून ठेकेदारांच्या माणसांकडून कटाई सुरू आहे.रस्त्याच्या बाजूला असलेले अनेक वृक्ष १५ ते २० वर्षे तर काही त्याहीपेक्षा जास्त जुने आहेत. मोठे डेरेदार, हिरवेकंच असे वृक्ष कटतांना पाहून सामान्य नागरिक हळहळत आहे. काही वृक्ष मागील पाच वर्षातच लावलेले असल्याने ते अद्यापही लोखंडी जाळ्यांच्या बाहेर आले नाही. झाडांची होत असलेली बेसुमार कत्तल पाहून वृक्ष व पर्यावरणप्रेमींमध्ये रोषही व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, वनीकरण विभाग व वन विभागानेही असंख्य झाडे लावली आहे. अनेक नागरिकांनी लहान बाळाप्रमाणे या वृक्षांची जोपासना करून ती वाढविल्याने आज त्यांची कटाई होत असल्याचे त्यांना पहावले जात नाही. यामुळे आता या भागातून प्रवास करणाºया प्रवासी व वाहनचालकांना पुढील १०-१५ वर्षेतरी डेरेदार वृक्षांच्या छायेपासून वंचित राहावे लागेल.५० ते ६० फुटांचा रोड आता बोडखा झाला आहे. या रस्त्याने ये-जा करताना एकही वृक्ष रस्त्यावर दिसत नाही. झाडे कापणाºया टोळक्यांनी या सोबतच रस्त्याच्या कडेला असणारी असंख्य छाया देणारी वृक्षही तोडली आहे. उल्लेखनीय म्हणजे वृक्ष कटाई होत असताना कुणीही जबाबदार अधिकारी या ठिकाणी राहात नसल्याने मनमानी वृक्षतोड सुरू आहे. शेकडो ट्रक लाकूडफाटा येथून नेण्यात येत आहे. केवळ दोन हजार वृक्ष सिमेंट रस्त्याच्या कामासाठी कापली जात असल्याचा शासनाचा दावा असला तरी प्रत्यक्षात अडीच हजार वृक्ष यामध्ये कापल्या जाणार आहेत. रोडच्या दोन्ही बाजूस २० ते २५ फुटापर्यंतची झाडे कापली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षांची बेसुमार कत्तल झाल्याने याचा परिणाम पर्यावरणावर व आजूबाजूच्या गावांवर निश्चितच होणार आहे. या मार्गाने नेहमी जाणाºयांना चुकल्यासारखे वाटत आहे. राळेगाव तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल प्रथमच होत आहे. त्यामुळे अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे.ट्रकमधून विल्हेवाटमोठ्या प्रमाणात या ठिकाणी वृक्षतोड होत असली तरी तोडलेल्या लाकडांची मात्र चोरी होत आहे. कापलेल्या झाडांचे लाकूड नेमके कुठे जात आहे, हे समजायला मार्ग नाही. कटाई नंतर लाकूड काही ट्रकांमधून नेले जात असल्याचे दिसते.
अडीच हजार वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:46 AM
कळंब-राळेगाव-वडकी या ५० किलोमीटर परिसरात सिमेंट रोड बांधले जाणार आहे. यासाठी रुंदीकरणाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या मधात येणारी जवळपास अडीच हजार वृक्षांची गेल्या १५ दिवसांपासून ठेकेदारांच्या माणसांकडून कटाई सुरू आहे.
ठळक मुद्देसिमेंट रोड : जबाबदार अधिकाºयांच्या गैरहजेरीत सुरू आहेत कामे