लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुचाकी व चारचाकी वाहनांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाहन चोरीपासून तर अपघात थांबविण्यापर्यंत कारगर ठरणारी प्रणाली या वाहनांमध्ये वापरण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ नंतर तयार झालेल्या सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये ही प्रणाली असणे बंधनकारक आहे.एबीसी प्रणालीमध्ये अॅन्टी ब्रेकिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे. चारचाकी वाहनांमध्ये ही प्रणाली अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. आता तिचा वापर दुचाकींमध्ये केला जात आहे. अॅन्टी ब्रेकिंग सिस्टीमध्ये अचानक करकचून ब्रेक दाबले, तरी वाहन स्लिप होण्याची भीती राहात नाही.ब्रेक पायडल कितीही पुश केला, तरी ब्रेक पॅड ड्रमला चिपकत नाही. त्यामुळे दुचाकी नियंत्रित होऊन स्लिप होण्याचा धोका जवळपास नाहिसा झाला आहे. व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीममध्ये प्रवासी वाहने व नॅशनल परमिटच्या गाड्यांचा समावेश आहे. विमानाच्या ब्लॅक बॉक्सप्रमाणे ही ट्रॅकिंग सिस्टीम काम करणार आहे. वाहन कुठे आहे, त्याची गती किती, हे सर्व एका सिमकार्डच्या माध्यमातून माहीत होणार आहे. अपघातात या सिस्टीमचा ईलेक्ट्रीक पुरवठा खंडित झाल्यास आपत्कालिन स्थितीसाठी स्वतंत्र बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे इत्यंभूत माहिती मिळणार आहे.रस्त्यांची अवस्था सुधारलेली नसली तरी वाहन चालकांनी खबरदारी घेतल्यास अपघात टळू शकतात, त्यातच आता तंत्रज्ञानही त्यांच्या मदतीला राहणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.वाहन चोरी व विक्री झाली कठीणहाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) विकसित केली आहे. यामुळे वाहन चोरी करून तिची नंबर प्लेट बदलविल्यानंतर ओळख पटविणे सहज शक्य होणार आहे. अनेकदा वाहन चोरून नंबर प्लेट बदलविल्यानंतर त्याची सर्रास विक्री केली जात होती. या प्रकाराला आता आळा बसणार आहे. विशेष म्हणजे एचएसआरपी नंबर प्लेट वाहनाच्या किमतीत उपलब्ध होणार आहे. यासाठी डिलरला अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. एचएसआरपी सिस्टीममध्ये पीन नंबर असलेली नंबर प्लेट तयार होणार आहे. कोणत्या चेचीस व इंजीन नंबरला कोणती नंबर प्लेट दिली याचे रेकॉर्ड राहणार आहे.
चालकांच्या सुरक्षिततेसाठी दुचाकी वाहने होणार स्मार्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 9:39 PM
दुचाकी व चारचाकी वाहनांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाहन चोरीपासून तर अपघात थांबविण्यापर्यंत कारगर ठरणारी प्रणाली या वाहनांमध्ये वापरण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ नंतर तयार झालेल्या सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये ही प्रणाली असणे बंधनकारक आहे.
ठळक मुद्देव्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम : एबीएस, एचएसआरपी प्रणाली