लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : येथून जवळच असलेल्या धानोरा (लिंगती) येथील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात तेलंगणात रेती तस्करी होत असून महसूल विभाग व पोलीस विभागाने कारवाई करून या घाटावरून रविवारी सकाळी २४ ट्रॅक्टर जप्त केले.धानोरा (लिंगती) हे गाव महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर आहे. या घाटावरून तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात रेतीची तस्करी करण्यात येत आहे. त्याकडे मात्र कोणाचेही लक्ष नसल्याने कधी ट्रॅक्टर पकडल्यास चिरीमिरी देऊन मोकळे होणाऱ्या तेलंगणातील रेतीतस्करांची मुजोरी वाढतच जात होती. तेलंगणातील रेती घाटावरून नदी पार करून महाराष्ट्रातील चांगल्या प्रकारची रेती तस्करी करू लागले. कारण त्यांना आदिलाबाद येथे चांगला भाव मिळत होता. याबाबत गावकºयांनी त्यांना वारंवार समज दिली. परंतु त्यांची मुजोरी दिवसागणिक वाढतच होती. त्यांनी कोणाचेही न ऐकता रेती तस्करी सुरूच ठेवली. मागील अनेक दिवसांपासून जवळपास ४० ते ५० ट्रॅक्टरने रेतीची तस्करी सुरू होती. त्याचा कोणताही कर महसूल विभागाला मिळत नव्हता.वारंवार सूचना देऊनही ऐकण्याच्या मनस्थितीत महसूल विभाग नव्हता. अखेर गावकºयांनीच सरपंचाची मदत घेऊन महसूल विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने सकाळी ९ वाजता कारवाईला सुरूवात केली. या कारवाईमध्ये महाराष्ट्रातून रेती तस्करी करण्यासाठी आलेले २४ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. हे ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी पाटण पोलीस ठाण्यात नेण्यात आले. जप्त करण्यात आलेले सर्वच ट्रॅक्टर हे तेलंगणा राज्यातील असून सोबतच रेती गोळा करण्यासाठी आणलेले साहित्यसुद्धा जप्त करण्यात आले.ही झरी तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार शिवाजी लष्करे व त्यांचे सहकारी करीत आहे. घटनास्थळी मंडळ अधिकारी देशपांडे, तलाठी बाळकृष्ण येरमे, संदीप शेळके, गणेश गुशिंगे उपस्थित होते.
महाराष्ट्रातून तेलंगणात रेती तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:30 PM
येथून जवळच असलेल्या धानोरा (लिंगती) येथील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात तेलंगणात रेती तस्करी होत असून महसूल विभाग व पोलीस विभागाने कारवाई करून या घाटावरून रविवारी सकाळी २४ ट्रॅक्टर जप्त केले.
ठळक मुद्दे२४ ट्रॅक्टर जप्त : पोलीस आणि महसूल विभागाची संयुक्त कारवाई