शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

पाण्याने उडविली मागास वस्त्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 9:55 PM

मोठ्या अपेक्षेने नगरपालिकेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींमधील मागास वस्त्यांना अजूनही प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यात यंदा आलेल्या पराकोटीच्या पाणीटंचाईने तर त्यांची शब्दश: झोप उडविली आहे.

ठळक मुद्देविहिरी, हातपंप कोरडे : गुंडभर पाण्यासाठी रात्रभर शहर प्रदक्षिणा, पाण्याच्या ड्रमला लावावे लागते कुलूप

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोठ्या अपेक्षेने नगरपालिकेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींमधील मागास वस्त्यांना अजूनही प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यात यंदा आलेल्या पराकोटीच्या पाणीटंचाईने तर त्यांची शब्दश: झोप उडविली आहे. एखादवेळी कसेबसे मिळालेले पाणी १५ दिवस पुरविण्याची सर्कस करावी लागत आहे. कपडे धुतलेले पाणी नंतर भांडी धुण्यासाठी वापरायचे, लहान मुलांना खुर्चीवर बसवून अंघोळ घालायची, खाली टप ठेवून अंघोळीचे पाणी गोळा करायचे आणि तेच पाणी इतर कामांसाठी वापरायचे असा पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. ‘रियूझ’चा फंडा नागरिकांनी शोधला, मात्र प्रशासनाने या भागात टँकर वाढविण्याची तसदी काही घेतलेली नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी भरण्यासाठी येथील नागरिकांना रात्री शहराला अक्षरश: प्रदक्षिणाच घालावी लागते. जेमतेम दोन गुंड भरतानाच अर्धी रात्र संपून जाते. मग दुसऱ्या दिवशीच्या कामावरही परिणाम होतो...आधीच दुर्लक्षित असलेल्या मागास वस्त्यांची भिस्त हातपंप आणि नळावरच आहे. महिनाभरापासून येथे प्राधिकरणाचा नळही आलेला नाही. त्यामुळे नागरिकांचे लोंढे हातपंपावरच जमले आहेत. अर्ध्या हापश्यांनी तळ गाठला आहे. तर काही नादुरुस्त आहेत. दुरूस्तीसाठी नागरिकांनी नगरपरिषदेकडे वारंवार पुरवठा केला. तरी उपयोग झाला नाही.या वस्त्यांमध्ये टँकर घेऊन जाणारा ड्रायव्हर नगरसेवक सोबत असल्याशिवाय पाणीच वाटत नाही. पाणी दिल्यानंतरही अनेकजण टँकर मिळालेच नाही, असा आरोप करतात. यामुळे वितरित पाण्याची ग्राहकांच्या स्वाक्षरीने नोंद घेणे नगरसेवकांनी सुरू केले आहे.सहा ट्रिपनंतरही गांधीनगर तहानलेलेचगांधीनगरात प्रत्येक घराला पाणी मिळावे म्हणून टँकरचे नियोजन नगरसेवक गजानन इंगोले यांनी केले. त्याकरिता एक स्वतंत्र रजिस्टर केले. ज्यांना पाणी दिले, त्यांच्या त्यावर स्वाक्षºया घेतल्या जातात. मात्र दिवसाच्या सहा ट्रिप अपुºया आहेत. ज्या ठिकाणापासून पाणी वाटपाला प्रारंभ केला, त्या ठिकाणी पुन्हा येण्यासाठी किमान आठ दिवसाचा वेळ लागतो. तोपर्यंत या भागातील नागरिकांना पाणी जपून वापरावे लागते, असे जीवन भेंडारे म्हणाले. या भागात रोहित चौधरीचा लाँड्रीचा व्यवसाय आहे. पाण्याच्या कमतरतेने त्यांचा व्यवसायच प्रभावित झाला आहे. पाणी नसल्याने नागरिक कपडे कमी धूत आहेत. यामुळे कपडे प्रेसला येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.धोबीघाट पडला बंदतलाव फैलात गोळा होणारे पाणी धोबीघाटात जात होते. या ठिकाणावर कपडे धुतले जात होते. याकरिता या ठिकाणावर प्रचंड गर्दी व्हायची. तलाव फैलातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. नाला बांधला जात आहे. यामुळे या भागात पाणीच नाही. यातून धोबीघाटावर धुणे धुणाऱ्या गृहिणी आणि व्यावसायिकही दिसत नाही.जय बजरंग चौकात नळही कुचकामीगवळीपुऱ्याकडे जाणाऱ्या जय बजरंग चौकामध्ये एक सार्वजनिक नळ आहे. हा भाग उतारात आहे. यामुळे पूर्वी दररोज पाणी राहत होते. तीन ते चार किलोमीटर अंतरावरून नागरिक पाण्यासाठी येथे येत होते. आता तीन ते चार दिवसापासून नळ बंद आहे. रविवारी या नळाला बारीक धार होती. या भागातील इतर हातपंप कोरडे पडले आहेत. आता पाणी आणायचे तरी कुठून, असा गंभीर प्रश्न कौशल्या रामटेके, सुरेखा जाधव, कविता कोडापे यांनी मांडला.तलाव असूनही चमेडीयानगर कोरडेचमेडीयानगर तलाव फैल परिसरात आहे. तरी येथील बोअरवेल आणि हापश्या कोरडया आहे. यामुळे या भागातील नागरिकांची भिस्त टँकरवरच आहे. सात-आठ दिवसानंतर टँकर फिरविला जातो. यामुळे या भागातील नागरिकांची चांगलीच अडचण झाली आहे. पंचशिल चौकाकडून येथील नागरिक पाणी आणतात. त्यासाठी संपूर्ण दिवस वाया जातो, असे सुनिता भरने, भीमाबाई पावडे म्हणाल्या. अनेकजण भंगीपुऱ्यातून पाणी आणतात, असे त्यांनी सांगितले.पॉवर हाऊस परिसरात पाण्यासाठी जागरणया भागात रोजमजुरी करून पाण्यासाठी रात्र जागण्याची वेळ आली आहे. अरूंद रस्त्यांमुळे शेवटपर्यंत टँकर पोहचत नाही. यामुळे पाणी टिकविण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर केला जातो. कपडे धुतलेले पाणी भांड्यासाठी वापरले जाते, असे सुनिल उदापुरे म्हणाले. बहुतांश नागरिक कॉटन मार्केट, वॉटर सप्लाय आणि छोटी गुजरी चौकातून पाणी आणण्याच प्रयत्न करतात. संपूर्ण परिसर रात्री जागा असतो, असे शेख अय्यूब म्हणाले, समीर भानखेडे, इमरान खान, पप्पू ढाले, अजित माकोडे, चेतन कावळे, कांचन भानखेडे म्हणाले. नळाला पर्यायी व्यवस्था म्हणून टँकर आहेत. मात्र, ही व्यवस्था कुचकामी असल्याचे ते म्हणाले.खासगी टँकरची प्रतीक्षामोफत पाण्याचे टँकर मिळविण्यासाठी सात ते आठ दिवस प्रत्येक प्रभागाला प्रतीक्षा करावी लागत आहे. काही लोक अत्यावश्यक बाब म्हणून खासगी टँकरधारकांना फोन करतात. हे टँकरही वेटींगवर आहे. यामुळे खासगी टँकर मिळणेही अवघड झाले आहे.सार्वजनिक शौचालये मोडकळीससार्वजनिक शौचालये बोअरवेलवर आहेत. या बोअरवेलचे पाणी संपले आहे. यामुळे शौचालयातही पाणी नाही. यातून मागास वस्त्यांमधील शौचालयात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. आता नागरिकांनी शौचालयांकडे पाठ फिरवायला सुरूवात केली आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उपाययोजनांची मागणी आहे.