लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील तिवसा येथे एका शेतात अजगर आढळून आला . गावकऱयांनी या अजगराला फास टाकून पोत्यात जेरबंद केले . यावेळी गावकरी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होते . याच वेळी एका जागरूक नागरिकाने कोब्रा सर्पमित्र संस्थेस फोन केला . हे सदस्य तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱयांसोबत घटनास्थळी पोहचले आणि या अजगराची सुटका केली . सर्पमित्रांनी यावेळी गावकऱ्याना एकत्र करून पर्यावरण संरक्षणासाठी वन्यजीवांचे किती महत्व आहे हे समजावून सांगितले . वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सर्प मित्रानी या अजगरावर औषधोपचार करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले . यावेळी सर्पमित्र वेळीच जर पोहचले नसते तर अनर्थ झाला असता.