लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा कुस्तिगीर संघ आणि बाळासाहेब मांगुळकर मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यातून हज येथे जाणारे २३ यात्रेकरू आणि समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कीर्ती गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, प्राचार्य शंकरराव सांगळे, माणिकराव भोयर, जिल्हा कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर आदी उपस्थित होते.जिल्ह्यातून यावर्षी २३ व्यक्ती हजची यात्रा करणार आहे. त्यांचा कुस्तिगीर संघातर्फे शाल व हार घालून सत्कार करण्यात आला. शेख गुलाब शेख इस्माईल, अब्दुल जाकीर करीमभाई, मोहम्मद याकुब मो. आसिफ अली, शेख शैफुद्दिन शेख हाफिजोद्दिन, अ. सईदभाई अ. हमीद, शेख अहेमद शेख शब्बीर, जमील खान साहब, इस्माईल भाई, रमजानभाई सोलंकी, इकबालभाई या हज यात्रेकरूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.उन्हाळ्यात यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना नि:शुल्क पाणीवाटप करणारे निट्टू तिवारी, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेच्या संचालकपदी निवड झालेले विलास महाजन, रोटरी क्लब आॅफ मिडटाऊनचे नवनियुक्त अध्यक्ष अतुल मांगुळकर यांनाही यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कीर्ती गांधी, किशोर दर्डा, बाळासाहेब मांगुळकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन शेख जमील शेख गुलाब यांनी, तर आभार बाळासाहेब मांगुळकर यांनी मानले.कार्यक्रमासाठी नगरसेवक उध्दवराव साबळे, प्रताप पारसकर, अनिल पांडे, सुरेश जयसिंगपुरे, उद्धव बाकडे, रवी ढोक, दीपक ठाकूर, अफसर बेग कादीर बेग, मुन्नवर शाह, मिर्झा रियाज बेग, बाबाभाई रऊफ मिर्झा, सैयद कय्यूम, अबरार खान, कादिर बेग मिर्झा यांच्यासह जिल्हा कुस्तिगीर संघाचे सदस्य व बाळासाहेब मांगुळकर मित्र परिवारातील सदस्यांनी पुढाकार घेतला.
जिल्हा कुस्तिगीर संघाची सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 9:42 PM
जिल्हा कुस्तिगीर संघ आणि बाळासाहेब मांगुळकर मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यातून हज येथे जाणारे २३ यात्रेकरू आणि समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी हा कार्यक्रम घेण्यात आला.
ठळक मुद्देहज यात्रेकरू व सामाजिक योगदान देणाऱ्यांचा सत्कार : बाळासाहेब मांगुळकर मित्र परिवाराचा पुढाकार