शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

लग्न सोहळ्यातून जोपासली सामाजीक बांधिलकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 7:45 PM

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असतं. कौटुंबिक आनंदाला उधाण येतं. असाच आनंदोत्सव साजरा होत असताना काळे परिवारातील लग्न सोहळ्यात नवदांपत्यासह वऱ्हाडी मडळीने लेक वाचवा लेक शिकवा चा संकल्प करीत पाणी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

यवतमाळ -  लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असतं. कौटुंबिक आनंदाला उधाण येतं. असाच आनंदोत्सव साजरा होत असताना काळे परिवारातील लग्न सोहळ्यात नवदांपत्यासह वऱ्हाडी मडळीने लेक वाचवा लेक शिकवा चा संकल्प करीत पाणी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

दारव्हा येथील जीवन काळे हा युवक ओम युवा मंच व युवक टिमचा  सक्रिय कार्यकर्ता असून विविध सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर असतो. सामाजिक जाणीवेतुन काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास होता. दिनांक ३० एप्रिल रोजी जीवन व राणी विवाह बंधनात अडकले . विवाह सोहळा संस्मरणीय ठरला.सर्व प्रथम म. ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोहळ्या दरम्यान विविध सामाजिक संदेश देणारे फलक लक्ष वेधून घेत होते. लग्न सभागृह जणु वऱ्हाडी मंडळी सोबत सामाजिक विचारांचं आदानप्रदान करीत होतं. स्वच्छ भारत मिशनचा फलक कर्तव्याची जाणीव करून देत होता.लेक वाचावा लेक शिकवा चा सचित्र  संदेश मुलींविषयी आत्मसन्मान जागविणारा ठरला.एवढेच नव्हे तर पारंपारिक मंगलाष्टके आटोपताच नवदांपत्यासह वऱ्हाडी मंडळीने 'लेक वाचावा लेक शिकवा' ही शपथ घेतली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मंच च्या सौ.अर्चनाताई उडाखे यांनी सदर शपथ वदवून घेतली.यावेळी संपूर्ण सभागृह भारावून गेले.उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या गजरात या संकल्पनेचे  स्वागत केले. भोजनस्थळी अन्नाची नासाडी टाळण्याबाबतचा संदेश अंतर्मुख करायला लावणारा होता. भोजनावर मनसोक्त ताव मारल्यानंतर पाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पाणी फाऊंडेशनच्या श्रमदान चळवळीत सामील होण्याचे आवाहन करीत पाण्याचे महत्व पटवून दिले. या शिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विनम्र अभिवाचन करण्यात आले. सोबतच पर्यावरण वाचविण्याचा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे नवरी मुलीला निरोप दिल्या नंतर गृहप्रवेशा पूर्वी भुलाई या गावात जावून पानी फाऊंडेशन च्या उपक्रमात जीवन व राणी या  नवदांपत्याने श्रमदान केले. जलचळवळीत सहभागी होवून वेगळा आदर्श निर्माण केला.यावेळी ओम युवा मंच ,युवा टीम,सावित्रीबाई फुले महिला मंडळ हे सहभागी झाले होते.वधु वराचा ग्रामस्थांनी सन्मान केला.

नववधू-वरासह वऱ्हाडी मंडळी ने घेतलेली शपथ

 लेक वाचवा,लेक शिकवामी वचन बद्ध आहे.-  मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यास...- मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यास ...- मुलगी म्हणजे परक्याचे धन ही मानसिकता बदलण्यास..- मुले व मुली समानता करण्यासाठी...-  बालविवाह व हुंडा पध्दतीचा विरोध करण्यास...- महिलांना संपत्तीमध्ये समान अधिकार देण्यास..- प्रसूतीपूर्व गर्भनिदान तपासणीचा विरोध करण्यास ...- स्त्रीभ्रूण हत्येला विरोध करण्यास...- मुलींचे संरक्षण करण्यास.... मी वचन बद्ध आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या