यवतमाळ : येथील आदिवासी सोसायटीमध्ये घेण्यात आलेल्या महिलांच्या बैठकीत सामाजिक मेळावा घेण्याचा निर्णय झाला. २४ जानेवारी ही तारीख यासाठी निश्चित करण्यात आली. सोबतच आयोजन समितीही गठित करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या जिल्हाध्यक्ष मनीषा तिरणकर होत्या. गीत घोष, संतोष पेंदोर, कल्पनाताई नागभिडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रसंगी महिलांचे प्रश्न आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. बैठकीला मीना केळकर, मेघा वारवडे, रंजिता चव्हाण आदी उपस्थित होत्या.समितीमध्ये अध्यक्ष कल्पनाताई नागभिडकर, कार्याध्यक्ष मीनाताई केळकर, उपाध्यक्ष मेघा वानखडे, अनिता मुंगळे, सचिव मनीषा तिरणकर, सहसचिव रजनी चव्हाण, रेखा पाईकराव, कोषाध्यक्ष मंदा धवने, सदस्य उषा तपके, लीना नैताम, सरला केळकर, विद्या परचाके, दुर्गा नागभिडकर, भावना इवनाते, नीता उईके, सुलोचना नैताम, नीता ठाकरे आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)
सामाजिक मेळावा आयोजन समिती
By admin | Published: January 07, 2016 3:11 AM