शिक्षकांचा गौरव : नागसेन वृध्दाश्रमाचा पुढाकारहरसूल : समाजातील नैतिकता किती रसातळाला गेली आहे याचे मोजमाप करायचे असेल तर समाजात असणारी वृध्दाश्रम मोजली पाहिजेत, असे मत नागसेन वृध्दाश्रमात आयोजित शिक्षकांच्या सत्कार समारंभात विविध वक्त्यांनी व्यक्त केले.अध्यक्ष्यस्थानी नगरसेवक सुभाष अटल होते. प्रमुख पाहुणे म्हणून खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संजय दुद्दलवार, डॉ. विष्णु उकंडे, हरसूलचे उपसरपंच पंकज देशमुख, दारव्हा तालुका भाजपाचे दत्ता राहणे, अनिल डाखोरे, यादव गावंडे, उत्तमराव ठवकर उपस्थित होते. प्रास्तविक पंचायत समिती सदस्य मिलिंद मानकर यांनी केले. त्यांनी वृध्दाश्रमा मागील आपली भूमिका विषद केली. जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षक आमीन चौहान यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त राज्य शिक्षक पुरस्कृत शिक्षिका रूपाताई मानकर, वृध्दाश्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल भानुदास दुद्दलवार यांचा सत्कार करण्यात आला. पुसद येथील अंजली बेलोरकर यांनी वृद्धांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या. कार्यक्रमाला मधुकर भगत, गुणवंतराव देशमुख, पंकज इंगोले, प्रभाकर उपलेंचवार, प्रकाश रिंगणे, संतोष सातपुते, संदीप पंडागळे, शांताराम गावंडे, सचिन वानस्कर, विजय ठाकरे, संदीप उपलेंचवार, संदीप दुधे, दत्ता हिवाळे, दीपक भास्करवार, अर्जुन चव्हाण, श्रीराम पारधी, अनिल उबाळे, गजानन क्षीरसागर, सखाराम पारधी, मंदा ठाकरे, वनिता ठाकरे, डॉ. घोडके, रविंद्र दुद्दलवार उपस्थित होते. संचालन आनंद गायकवाड यांनी तर आभार महेंद्र मानकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी एम. फास प्रतिष्ठानचे कैलास खांदवे, सुरेश हाडके, दीपक रिंगणे, मुरलीधर भगत, निरंजन रिंगणे, श्रीकृष्ण मांजरे, भगवान वंजारे, संतोष सप्रे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
समाजाने नाकारले, वृद्धाश्रमाने स्वीकारले!
By admin | Published: September 22, 2016 1:56 AM