शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
3
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
4
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
5
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
6
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
7
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
8
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
10
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
11
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
12
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
13
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
14
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
15
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
16
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
17
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
18
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
19
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
20
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?

निळोणाचे फ्लोटिंगपंप व गोखीच्या पाण्यावर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:18 PM

अर्ध्याअधिक शहराला ‘जीवन’ देणारा चापडोह प्रकल्प साथ सोडण्याच्या स्थितीत आला आहे. या प्रकल्पातून अखेरची खेप सोडली जात आहे.

ठळक मुद्देचापडोह साथ सोडणार : नगरपरिषदेची जबाबदारी वाढणार

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : अर्ध्याअधिक शहराला ‘जीवन’ देणारा चापडोह प्रकल्प साथ सोडण्याच्या स्थितीत आला आहे. या प्रकल्पातून अखेरची खेप सोडली जात आहे. आता निळोणा प्रकल्पात लावले जात असलेले फ्लोटींग आणि गोखी प्रकल्पावर शहराला पाणीपुरवठ्याची मदार आहे. नगरपरिषदेच्या टँकरने दिवसही भागत नाही. टँकर वाढवून शहराची तहान भागविण्याची नगरपरिषदेची जबाबदारी वाढली आहे.चापडोह प्रकल्पातून पाणी ओढण्याचे सर्व मार्ग संपले आहे. चर खोदून, फ्लोटींग (तरंगते पंप) पंप लावून महिना-दीड महिना भागवता आला. या प्रकल्पात आता पाण्याचे डबके तेवढे दिसतात. त्यातून पाणी ओढण्याचा प्रयोगही अघोरी ठरणारा आहे. दर्डानगर, सुयोगनगर, लोहारा, वैभवनगर, वाघापूर नाका, पिंपळगाव येथील टाक्यांमध्ये या प्रकल्पाचे पाणी घेतले जाते. तेथून ज्या भागाला पाणी सोडले जाते, त्या भागाचाही भार आता नवीन उपाययोजनांवर येणार आहे.निळोणा प्रकल्पाचे भिंतीजवळ असलेले पाणी फ्लोटींग पंपाद्वारे पाणी साठवणुकीच्या विहिरीजवळ आणले जात आहे. सहा पंप या ठिकाणी लावले जात आहे. फ्लोटींगसाठी २४ तास वीज मिळावी याकरिता नवीन खांब टाकून तारा ओढण्यात आल्या आहे. तातडीच्या उपययोजनेअंतर्गत ही कामे करण्यात आली. त्यामुळे निळोणाचे पाणी आता चापडोहच्या टाक्यांमध्ये घेतले जाणार आहे. केवळ निळोणाच्या भरवशावर यवतमाळकरांची पाण्याची गरज पूर्ण करणे कठीण आहे. पाणी साठवून ओढण्यासाठी लागणारा कालावधी आणि शुध्दीकरणासाठी विलंब होणार असल्याने पाणीपुरवठ्यात आणखी गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.निळोणाच्या सोबतीला गोखी प्रकल्पाचे पाणी घेतले जाणार आहे. ४० लाख रुपयांची ही आकस्मिक उपाययोजना आहे. या योजनेचे पाणी दर्डानगर टाकीमध्ये घेतले जाणार आहे. येत्या आठ दिवसात हे काम मार्गी लागणार असल्याचे सांगितले जाते. या कामासाठी लागणारे काही आवश्यक साहित्य अमरावती जिल्ह्यातील एका योजनेचे आणण्याची तयारी प्राधिकरणाने केली आहे. गोखीचे पाणी शक्य तितक्या लवकर मिळाल्यास निळोणावरचा भार कमी होणार आहे. निळोणातील पाणी आताच्या पाणी वितरणानुसार महिनाभर पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.‘शिवजल’चे २८ टँकर लागणारवंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजने अंतर्गत आमदार प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या सहकार्याने यवतमाळात २८ टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे टँकर सुरू केला जाईल. यावर शिवसैनिकांचे नियंत्रण राहणार आहे. यासाठी गोखी प्रकल्पाच्या प्लांटवरून पाणी घेतले जाणार आहे, अशी माहिती शिवसेना यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संजय ढवळे यांनी दिली. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, नगराध्यक्ष कांचन चौधरी यांचे सहकार्य मिळत असल्याचे संतोष ढवळे यांनी सांगितले.जलशुद्धीकरणाला लागणार वेळनिळोणाचे पाणी जंतुमुक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी प्रवाहित करूनच विहिरीत (जॅकवेल) सोडले जाणार आहे. टप्पा पध्दतीने पाणी पुढे सरकविले जाईल. त्यामुळे जंतू नाहिसे होऊन पाणी गाळमुक्त होईल. या पद्धतीने घेतलेले पाणी शद्धीकरणासाठी पाठविले जाईल. ही सर्व प्रक्रिया करताना शुद्धीकरणास विलंब होणार असल्याने, वितरण लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Waterपाणी