विलास ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कशिंदोला : मातीचे परीक्षण न करताच, संबंधित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्याचा धक्कादायक प्रकार वणी तालुक्यात पुढे आला आहे. या प्रकारामुळए शेतकरी चक्रावून गेले आहेत. यवतमाळ येथील कृषी चाचणी प्रयोग शाळेतून या पत्रिका प्राप्त झाल्या आहेत.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे मोफत परीक्षण करून दिले जाते. त्यानुसार, यावर्षीदेखील ही मोहिम राबविण्यात आली. मात्र वणी तालुक्यातील मेंढोली या गावातील शेतकऱ्यांना नवाच अनुभव आला. या परिसरातील कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतातून मातीचे संकलन न करता, तपासणी करण्यात आल्याचे दाखवून मृदा आरोग्य पत्रिका देण्याचा प्रकार घडला. नियमानुसार, हंगामापूर्वी म्हणजेच मे किंवा जून महिन्यात मातीचे संकलन व परीक्षण करून त्याचा अहवाल शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असते. परंतु देण्यात आलेल्या आरोग्य पत्रिकांमध्ये माती संकलन चक्क आॅगस्ट महिन्यात करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे आॅगस्ट महिन्यात शेतांमध्ये पीक उभे असते.मेंढोली येथील अनेक शेतकऱ्यांना नुकत्याच मृदा आरोग्य पत्रिका मिळाल्या. सदर मृदा आरोग्य पत्रिका पाहताच शेतकऱ्यांना धक्काच बसला. दिवसेंदिवस अधिक उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने शेतीत रासायनिक खतांसह पाण्याचा अनिर्बंध वापर होत आहे. परिणामी जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे मृदेचे आरोग्य चांगले राखण्याच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजना सन २०१५-१६ पासून राज्यात राबविल्या जात आहे.त्याद्वारे सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका तपासणी करून द्यावयाची आहे. या पत्रिकेद्वारे शेतकऱ्यांना जमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, अन्नद्रव्यांची पातळी आणि कमतरता माहित होते. त्यानुसार विविध पिकांसाठी मिश्र व संयुक्त खतांची मात्रा ठरवता येते.मृदा आरोग्य पत्रिका टाकल्या पानटपरीवरगंभीर बाब ही की, या बनावट मृदा आरोग्य पत्रिका संबंधित कर्मचाऱ्याने चक्क मेंढोलीतील एका पानटपरीवर ठेवल्या. अनेक दिवस त्या तेथेच पडून होत्या. त्यामुळे अनेकांना त्या पत्रिका मिळाल्यादेखील नाही.यवतमाळ येथील अॅग्रीकल्चर टेस्टींग लॅबोरटरीकडून मृदा आरोग्य पत्रिका आम्हाला नुकत्याच मिळाल्या. त्यावर मृदा संकलनाची तारीख ६ आॅगस्ट नमूद करण्यात आली आहे. मात्र या तारखेला माझ्या शेतातून संबंधित विभागाने मृदा परीक्षणासाठी मृदा नमूना संकलीत केली नाही. याबाबत चौकशी व्हावी.- दिवाकर पंधरे, शेतकरी, मेंढोली
परीक्षण न करताच मृदा आरोग्य पत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 9:54 PM
मातीचे परीक्षण न करताच, संबंधित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्याचा धक्कादायक प्रकार वणी तालुक्यात पुढे आला आहे. या प्रकारामुळए शेतकरी चक्रावून गेले आहेत. यवतमाळ येथील कृषी चाचणी प्रयोग शाळेतून या पत्रिका प्राप्त झाल्या आहेत.
ठळक मुद्देधक्कादायक प्रकार : मातीचे नमुने घेतलेच नाहीत, शेतकरी संभ्रमात