कात्री येथे कार्यक्रम : शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीकडे लक्ष देण्याचे आवाहन कळंब : सततच्या नापिकीमुळे शेतकरी आत्मविश्वास गमावत चालला आहे. त्यातूनच नैराश्येचे वातावरण निर्माण होते. यातून सावरण्यासाठी शेती उत्पादनात वाढ करणे आवश्यक आहे. माती परीक्षण करुन उत्पन्न घेतल्यास उत्पादन वाढीस मदत मिळते. त्यामुळे माती परीक्षण काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ.अशोक उईके यांनी केले. तालुक्यातील कात्री येथे माती परीक्षण मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, कृषी शास्त्रज्ञ डॉ.प्रमोद यादगीरवार, सभापती वर्षा वासेकर, उपसभापती विजय गेडाम, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, सरपंच पुरुषोत्तम आगलावे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आनंदराव जगताप, भाजपा तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, कळंबचे उपनगराध्यक्ष मनोज काळे, बांधकाम सभापती आशिष धोबे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले आदी उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. तत्पूर्वी कृषी शास्त्रज्ञ गोपाल ठाकरे यांनी माती परीक्षणाविषयी माहिती दिली. संचालन कृषी विस्तार अधिकारी पंकज बरडे यांनी तर आभार कृषी अधिकारी किशोर अंबरकर ंयांनी मानले. कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी गुल्हाने, मंडळ अधिकारी संजय रोहणकर, शाखा अभियंता अशोक कयापाक, कृषी सहायक हेमराज देवगडे, प्रवीण चंदनशिवे, दिनेश उगले, तलाठी प्रिया नलगे, पोलीस पाटील मंगेश मलकापूरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
माती परीक्षण मार्गदर्शन शिबिर
By admin | Published: April 10, 2016 2:52 AM