रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणीपुरवठा योजना सौरउर्जेवर चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसी (मेडा) प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी देणार आहे.ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा मोटरपंप सौर उर्जेवर जोडला जाणार आहे. त्याकरिता जुन्याच टाक्यांचा वापर करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ४० गावांचा पाणीपुरवठा सौर पंपावर करण्यात येणार आहे. राज्यातल्या ३६ जिल्ह्यातील १४४० गावांमध्ये सौर ग्रामीण पाणीपुरवठा योजना चालविली जाणार आहे. त्यासाठी ‘मेडा’ने ७५ कोटींचा निधी वळता केला आहे. जून पूर्वी हे काम पूर्णत्वास येणार आहे, असे मेडाचे विभागीय संचालक सारंग महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर सौर उर्जेवरील पाणीपुरवठा योजना सुरू होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याकडे दोन कोटी रूपये वळते करण्यास ‘मेडा’ने सुरूवात केली आहे. दुष्काळी स्थिती आणि विविध कारणाने राज्यभरातील पाणीपुरवठा योजना दरवर्षीच अडचणीत येतात. भरउन्हाळ्यात वीज पुरवठा कापला जातो. यामुळे पाणी असतानाही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतो.या स्थितीवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यावर ऊर्जा विभागाने भर दिला आहे. यामुळे वीज बिल थकल्याने पाणीपुरवठा खंडीत झाला, असा प्रकारच घडणार नाही. नागरिकांना भारनियमनामुळे टाकी भरली नाही, असे उत्तर ऐकायला मिळणार नाही.पाणीपुरवठा योजना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने ऊर्जा विभागाने पाऊल उचलले आहे. प्रायोगिक तत्वावर काम करण्यासाठी ऊर्जा विभागाने मंजुरी दिली असून कामकाजाला प्रारंभ झाला आहे.- मदन येरावार- ऊर्जा राज्यमंत्री
सौरउर्जेवर चालणार पाणीपुरवठा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 5:48 PM
पाणीपुरवठा योजना सौरउर्जेवर चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसी (मेडा) प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी देणार आहे.
ठळक मुद्दे‘मेडा’चे अर्थसहाय्य ऊर्जा मंत्रालयाने केले शिक्कामोर्तब