शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मुलाची साक्ष, बापाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:07 PM

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पतीने जाळल्याचा गुन्हा येथील सत्र न्यायालयात मंगळवारी सिद्ध झाला. चार वर्षीय मुलाच्या साक्षीवरून न्यायालयाने आरोपी बापाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

ठळक मुद्देपत्नीचा खून करून मृतदेह जाळल्याचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पतीने जाळल्याचा गुन्हा येथील सत्र न्यायालयात मंगळवारी सिद्ध झाला. चार वर्षीय मुलाच्या साक्षीवरून न्यायालयाने आरोपी बापाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.अंकुश धर्मा चव्हाण असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो पुसद तालुक्याच्या पिंपळगाव इजारा येथील रहिवासी आहे. पत्नी लक्ष्मीबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन १२ डिसेंबर २०१४ रोजी तिचा खून करून मृतदेह जाळल्याचा आरोप अंकुशवर होता. लक्ष्मीबाईच्या खुनाचा खटला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. गावडे यांच्या न्यायालयात चालला. न्यायालयाने या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासले. त्यात मृतक व आरोपी यांचा चार वर्षाचा मुलगा तसेच इतरांची साक्ष महत्वाची ठरली. या घटनेत कुणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. परिस्थितीजन्य पुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी अंकुश चव्हाण याला भादंवि कलम ३०२ मध्ये जन्मठेप व हजार रुपये दंड तसेच पुरावा नष्ट केल्याच्या कलम २०१ मध्ये एक वर्षाची शिक्षा व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा मंगळवारी न्या. गावडे यांनी सुनावली. या प्रकरणात शासनातर्फे अ‍ॅड. महेश निर्मल यांनी बाजू मांडली.प्रकरण असे की, अंकुश हा कुटुंबासह पिंपळगाव येथे राहत होता. चारित्र्यावर संशय घेऊन तो पत्नी लक्ष्मीबाईचा छळ करीत होता. याच कौटुंबिक वादातून १२ डिसेंबर २०१४ रोजी गावात पंच व नातेवाईकांची समेटासाठी बैठक झाली. पंचांनी दोघांचीही समजूत काढली. त्यानंतर पत्नीला चांगले वागविण्याचे आश्वासन अंकुशने दिले. त्यानंतर ते दोघेही घरी निघून गेले. याच समेटाचा राग अंकुशच्या मनात होता. रात्री घरी कुणीही नसल्याची संधी पाहून अंकुशने लक्ष्मी हिचा गळा आवळून खून केला. लक्ष्मी ही जळाल्याने मरण पावल्याचे चित्र उभे करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह पेटवून दिला व तो घरातून पळून गेला. तो पळून जात असताना बाहेर उभा असलेल्या त्याच्या चार वर्षीय मुलाने त्याला पाहिले.मुलाने घटनेची माहिती लक्ष्मीचे काका व आजोबाला दिली. त्यावरून अंकुशविरुद्ध खंडाळा पोलीस ठाण्यात लक्ष्मीच्या काकाच्या फिर्यादीवरून भादंवि ३०२, २०१, ४९८ अ कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला. तत्कालीन ठाणेदार व्ही.के. वडतकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला.घटनेच्यावेळी आपण हजर नव्हतो, नातेवाईकाकडे मुक्कामी होतो, असा बचाव आरोपी अंकुशने न्यायालयात घेतला. एवढेच नव्हे तर त्या नातेवाईकांना साक्षीसाठी न्यायालयात हजरही केले. या खटल्यात न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून पंडित पुंडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Murderखून