लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : यावर्षीच्या अत्यल्प पावसाने सर्वांचीच काळजी वाढली आहे. कळंब तालुक्यात काही ठिकाणी अल्प पाणी तर काही ठिकाणी पाणीच नाही, अशी परिस्थिती आहे. याचा फटका पिकांना बसला आहे. सावरगाव परिसरात तर पावसाअभावी सोयाबीनची पिके करपली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गांत काळजी पसरली आहे.सावरगाव, परसोडी, चिंचोली, टालेगाव, पिंपळगाव, दहेगाव, माटेगाव, उमरी आदी गावांमध्ये तर बरेच दिवसांपासून पावसाने दडी मारली. कमी पावसाचे पीक असल्यामुळे कपाशी तग धरुन आहे. परंतु सोयाबीनला मात्र पाण्याची नितांत आवश्यकता असते. परंतु वेळेवर पाणीच न आल्याने सोयाबीनची पूर्ण पेरणीच उलटली आहे. त्यामुळे सावरगाव परिसरातील सोयाबीन पिकांचा सर्व्हे करण्यात यावा तसेच शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परसोडीचे सरपंच आनंदराव जगताप, माजी पंचायत समिती सभापती शशिकांत देशमुख, माटेगावचे सरपंच किशोर जगताप, चंदु आगलावे, रामदास चौधरी, रमेश कळसकर, अतुल घोटेकार आदींनी केली आहे.
सावरगाव परिसरात सोयाबीनची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 9:41 PM