शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

सोयाबीन बियाणे सौदे-बुकींग उलाढाल कोट्यवधीत; यवतमाळ जिल्ह्यात कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 11:34 AM

एकीकडे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, महागड्या दराने ते खरेदी करावे लागते तर दुसरीकडे सोयाबीन बियाणे कंपनीच्या गोदामांमधून थेट दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नेऊन विकले जात आहे.

ठळक मुद्देमाल परस्पर जातो दुसऱ्या जिल्ह्यांमध्येशेतकऱ्यांवर घरचे बियाणे पेरण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रमुख वितरकांकडून सोयाबीन बियाण्यांच्या थेट कंपन्यांशी होणाऱ्या सौदे व बुकींगमध्येच कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ केली जाते. एकीकडे जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, महागड्या दराने ते खरेदी करावे लागते तर दुसरीकडे सोयाबीन बियाणे कंपनीच्या गोदामांमधून थेट दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नेऊन विकले जात आहे.यवतमाळातील सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांनी शेतकऱ्यांची लूट चालविली आहे. एवढेच नव्हे तर ‘रिटेलर’लाही (किरकोळ विक्रेते) मागणीच्या अर्धाच आणि तोही जादा दराने पुरवठा केला जात आहे. त्यातूनच या वितरकांच्या दरवर्षी चालणाऱ्या बियाण्यांच्या खरेदी-विक्री व्यवसायातील एकूणच ‘गौडबंगाल’ पुराव्यानिशी पुढे आले आहे. वितरक बियाणे कंपन्यांशी चार महिने आधीच सौदे करतात. त्यात एक हजार ते पाच हजार बॅगपर्यंत सौदे केले जातात. त्याचे ५० टक्के पेमेंटही लगेच दिले जाते. परंतु या सौद्याची ‘एमआरपी’ किती असावी हे वितरक निश्चित करतो. उर्वरित पैसे संपूर्ण माल प्राप्त झाल्यानंतर दिले जातात. यात प्रत्येक बॅगवर किमान ५०० ते ७०० रुपये मार्जीन वितरक निश्चित करतो व त्या पद्धतीनेच एमआरपी बॅगवर नोंदविली जाते.याशिवाय बियाण्यांचे बुकींग कंपनीकडे केले जाते. यात कंपनी दर निश्चित करते, मालाचा पुरवठाही कंपनीच्या सोईने होतो. यात बरेचदा कंपन्यांची मनमानी चालते. मागणीच्या ४० ते ६० टक्केच पुरवठा केला जातो. विशेष असे, बुकींग व सौद्यासाठी बहुतांश पैसा हा रिटेलरकडून उभा केला जातो. त्यात प्रमुख वितरकाची गुंतवणूक नाममात्र असते.सौदे व बुकींगच्या बियाण्यांची बरीच विल्हेवाट मात्र दुसऱ्या जिल्ह्यात लावली जाते. यवतमाळचे वितरक हिंगणघाट, चंद्रपूर, वर्धा, सोलापूर, नांदेड, हिंगोली, परभणी, दर्यापूर, कोपरगावपर्यंत बियाण्यांचा पुरवठा करतात. थेट कंपनीतूनच हा माल त्या-त्या जिल्ह्यात पाठविला जातो. पैसा मात्र यवतमाळच्या वितरकाकडे येतो. हा वितरक मग हा पैसा वापरुन तीन महिने विलंबाने बिल बनवितो. दुसऱ्या जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांचा माल पाठविता यावा यासाठी स्थानिक पातळीवर कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. रिटेलरला मागणीच्या अर्धा आणि तोही जादा दरात पुरवठा केला जातो. थेट शेतकरी आल्यास त्यालाही ५०० ते ७०० ची मार्जीन ठेऊन दर सांगितला जातो. टंचाई व त्यातून दर वाढल्याने आता शेतकऱ्यांवर उत्पादन क्षमता कमी असलेले घरचे बियाणे पेरण्याची वेळ आली आहे.

धामणगाव-पांढरकवडा रोड गोदामात साठायवतमाळचे सोयाबीन बियाणे विक्रेत्यांची धामणगाव रोड व पांढरकवडा रोडवर मोठी गोदामे असून तेथेच मोठा साठा आहे. तर दुसरीकडे कंपनीकडून अलॉटमेंट आलेच नाही, यावर्षी लॉकडाऊनमुळे कंपन्या पैश्यासाठी साईड देत नाहीत असे सांगून रिटेलर व शेतकऱ्यांसाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अनेक ठिकाणी जिनिंगमधील गोदामात सोयाबीनचा साठा केला गेला आहे. पांढरकवडा रोडवर मोठ्या १६ गोदामांमध्ये हा साठा आहे. १६ टनच्या एका ट्रकमध्ये ५३३ बॅग भरुन हा माल रवाना केला जाणार आहे.

साठा हलविणार, जिल्हा प्रशासनाला हुलकावणी‘सोयाबीन बियाणे विक्रेत्यांची गोदामेच तपासा ना’ असे आव्हान ‘लोकमत’ने गुरुवारी वृत्तामधून जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यामुळे हादरलेल्या प्रमुख वितरकांनी गोदामांमधील माल हलविण्याचे नियोजन केले आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजता धामणगाव रोड व पांढरकवडा रोडवरील गोदामांवर ट्रक लावून हा माल दुसरीकडे हलविण्याचे प्लॅनिंग करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्हा प्रशासनालाही हुलकावणी देण्याचा बियाणे विक्रेत्यांचा प्रयत्न आहे.

 

टॅग्स :agricultureशेती