यवतमाळ : येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांच्यावर गाळे भाड्यात अनियमितता केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. गेल्या २५ वर्षांत नगरपरिषदेच्या चाळीस गाळ्यांचे उत्पन्न शून्य असून त्यामुळे पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय ४२९ गाळ्यांचा करार संपूनही गाळेधारकांवर प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. चुकीच्या व आडमुठ्या माहितीमुळे गाळे भाडेवाढ मूल्य निर्धारणाचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. गाळ्यांच्या भाडेवाढीसंदर्भात पालिकेच्या सर्वसाधारण सभेत २०१५ मध्ये ठराव झाला. मात्र मुख्याधिकारी धुपे यांनी त्याची अंमलबजावणीच केली नाही. गाळ्यांचे भाडे आणि अनामत रकमेचे अद्याप आॅडिट झाले नाही. याबाबत सेंटर फॉर अवेअरनेस, जस्टिस अॅन्ड ह्युुमन राईटस्चे संचालक प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांच्या तक्रारीवरून एसपींनी ही परवानगी मागितली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
‘सीओं’वर गुन्हा नोंदविण्यासाठी ‘एसपीं’नी मागितली परवानगी
By admin | Published: April 19, 2017 1:10 AM