आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे कोलाम पोडांना जोडणाºया रस्त्यांसाठी १० कोटींचा निधी पडून आहे. या निधीची विल्हेवाट लावण्यासाठी आता ६ फेब्रुवारीला विशेष सर्वसाधारण सभा पाचारण करण्यात आली आहे.शासनाने २०१६ मध्ये कोलाम पोडांना जोडणारे रस्ते बांधण्यासाठी १२ कोटी ७४ लाख रूपयांचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिला. त्यापैकी १० कोटी ७६ लाख रूपये अद्याप शिल्लक आहेत. प्रथम निवडणुकीमुळे ही प्रक्रिया लांबली. त्यानंतर नवीन पदाधिकारी आरूढ झाले. त्यांच्यात नेमके कोणत्या कोलाम पोडांना रस्ते द्यावे, यावरून वाद सुरू झाले. बांधकाम सभापतींनी आपल्याच प्रभावातील कोलाम पोडांना रस्ते देण्याचा घाट घातला. वास्तविक जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोलाम पोड आहेत. मात्र त्यांना पद्धशीरपणे वगळण्यात आले. परिणामी अध्यक्ष आणि सभापतींमध्ये दुरावा निर्माण झाला.काही दिवसांपूर्वी याच कारणावरून दोघांत वादावादी झाली. १० जानेवारीच्या सर्वसाधारण सभेतच कोलाम पोड जोडणी कार्यक्रमाला मंजुरी देण्याचा घाट घेतला गेला. मात्र अध्यक्षांनी तो उधळून लावला. यामुळे जिल्हा परिषद सत्तेत फेरबदल करण्यासाठीही चाचपणी करण्यात आली. आता अखेर खास कोलाम पोड जोडणी रस्त्यांना मंजुरी देण्यासाठी येत्या ६ फेब्रुवारीला विशेष सभा बोलविण्यात आली.
रस्त्यांसाठी विशेष सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 9:56 PM
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे कोलाम पोडांना जोडणाºया रस्त्यांसाठी १० कोटींचा निधी पडून आहे.
ठळक मुद्दे१० कोटी पडून : कोलाम पोड रस्त्यांनी जोडणार