मुंबई - राज्यातील 1728 पोलिसांना विशेष सेवा पदक जाहीरयवतमाळ : विदर्भातील नक्षलग्रस्त जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या 1728 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासनाने 31 डिसेंबर रोजी 'उत्कृष्ट सेवा पदक' जाहीर केले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील तीनशेपेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पदक जाहीर झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये भारतीय पोलीस सेवा (भापोसे) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिक्काऱ्यांचा समावेश आहे. गडचिरोली नंतर यवतमाळ ला सर्वाधिक सेवापदके जाहीर झाली आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आदी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी या सेवा पदकाचे मानकरी ठरले आहेत. पदक जाहीर झालेले हे पोलीस अधिकारी सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात सेवा बजावत आहेत. यवतमाळच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढया मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकाचवेळी विशेष सेवा पदके जाहीर झाली आहेत.