लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : गेल्या काही दिवसांपासून पाटणबोरी परिसरातील अंधारवाडी, वासरीसह परिसरातील गावालगतच्या जंगलात धुमाकूळ घालत अनेक पाळीव जनावरांसह एका इसमावर हल्ला करणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी मेळघाटातील वन विभागाचा स्पेशल टायगर प्रोटक्शन फोर्स पाटणबोरीत दाखल झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून हे पथक वाघिणीची सर्चींग करीत आहे. सध्या ही वाघिण त्याच परिसरात वावरत आहे. तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी ४० पेक्षा अधिक कॅमेरे लावण्यात आले आहेत.मागील जुलैै महिन्यापासून या वाघिणीचा धुमाकूळ सुरू आहे. पाटणबोरी परिसरातील अंधारवाडी, वासरी शिवार, कोबई, कोपामांडवी या भागात वावरत आहे. गुरूवारी पाटणबोरीलगच्या बंद असलेल्या गिट्टी क्रेशर परिसरात या वाघिणीने दर्शन दिल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. या वाघिणीने आतापर्यंत १० जनावरे ठार मारली आहेत. ४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता वासरी शिवारात सुभाष कायतवार या शेतकऱ्यावर वाघिणीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून तो झाडावर चढला. मात्र तरीही वाघिणीने त्याला जखमी केले. सातत्याने वाढत असलेला वाघिणीचा धुमाकूळ पाहता परिसरातील गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. या हल्लेखोर वाघिणीचा बंदोबस्त करा, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांनी केली.परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच, हल्लेखोर वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी मेळघाटातील वन विभागाच्या स्पेशल टायगर प्रोटक्शन फोर्सला पाटणबोरीत पाचारण करण्यात आले आहे. या पथकात १० जणांचा समावेश आहे. या पथकाने वाघिणीच्या हालचालीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या वाघिणीला पकडून अन्य ठिकाणी नेऊन सोडण्याचा वनविभागाचा प्लॅन आहे. या पथकाच्या मदतीला पांढरकवडा येथील वन विभागाने सहाजणांचा समावेश असलेले रॅपिड रिस्पॉन्स युनिट तयार केले आहे. या युनिटमधील सदस्यांना अमरावती येथील वन विभागाच्या अधिकाºयांनी नुकतेच प्रशिक्षण दिले. हे पथक सध्या पाटणबोरी परिसरात वाघिणीची मॉनिटरींग करीत आहे.वाघाच्या संख्येबाबत गावकऱ्यांमध्ये संभ्रमअंधारवाडी व वासरी शिवारात धुमाकूळ घालणारे वाघ हे वेगवेगळे असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र वनविभागाच्या मते, या दोन्ही गाव परिसरात हल्ले करणारी एकच वाघिण आहे. ही वाघिण गर्भवती असून तिला सध्या मोठ्या प्रमाणावर आहार लागत असल्याने ती पाळव जनावरांवर हल्ले करीत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून हा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांना शेतात जाणे कठिण होऊन बसले आहे. शेतात जाता येत नसल्याने ऐन हंगामात शेतीची कामे खोळंबून आहेत.
हल्लेखोर वाघिणीच्या बंदोबस्तासाठी स्पेशल टास्क फोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 5:00 AM
मागील जुलैै महिन्यापासून या वाघिणीचा धुमाकूळ सुरू आहे. पाटणबोरी परिसरातील अंधारवाडी, वासरी शिवार, कोबई, कोपामांडवी या भागात वावरत आहे. गुरूवारी पाटणबोरीलगच्या बंद असलेल्या गिट्टी क्रेशर परिसरात या वाघिणीने दर्शन दिल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. या वाघिणीने आतापर्यंत १० जनावरे ठार मारली आहेत. ४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता वासरी शिवारात सुभाष कायतवार या शेतकऱ्यावर वाघिणीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देपाटणबोरी परिसरात सर्चिंग : मदतीला रॅपीड रिस्पॉन्स युनिट, वाढत्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष