शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

जिल्हा परिषदेत सत्तेचा तमाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 10:16 PM

जिल्हा परिषदेत सत्तेसाठी तमाशा सुरू झाला. नुकतेच दोन सभापतींना पायउतार करण्यात आले. यातून युती आणि आघाडीतील सदस्यांची सत्तेची हाव दिसून आली. पद मिळविण्यासाठी युती आणि आघाडीतील सदस्यांनी नितीमत्ता खुंटीला टांगल्याचेही यावरून दिसून आले.

ठळक मुद्देयुती अन् आघाडी संधीसाधू : दोघांमध्येही बेबनाव कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेत सत्तेसाठी तमाशा सुरू झाला. नुकतेच दोन सभापतींना पायउतार करण्यात आले. यातून युती आणि आघाडीतील सदस्यांची सत्तेची हाव दिसून आली. पद मिळविण्यासाठी युती आणि आघाडीतील सदस्यांनी नितीमत्ता खुंटीला टांगल्याचेही यावरून दिसून आले.जिल्हा परिषदेत दोन वर्षांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने विचित्र युती करून सत्ता बळकावली. यात केवळ ११ सदस्य असलेल्या काँग्रेसला अध्यक्षपदासह एका सभापती पदाची लॉटरी लागली. भाजपला दुसऱ्या क्रमांकाच्या पदासह सभापती पद मिळाले. राष्ट्रवादी आणि अपक्षालाही एक सभापतीपद मिळाले. सर्व सुरळीत सुरू असताना आता राष्ट्रवादी व अपक्ष सभापतींना पायउतार करण्यात आले. अर्थात सदस्यांचा तो हक्क आहे. मात्र या सभापतींना पायउतार करताना सर्वांनीच नितीमत्ता गुंडाळून ठेवल्याचा प्रत्यय जिल्ह्यातील जनतेला आला.राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याने त्यांच्या ३८ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. इथपर्यंत कुणाची हरकत नव्हती. मात्र प्रत्यक्षात ठरावावरील मतदानात सर्वच पक्षांचे नेते आणि जिल्हा परिषदेतील त्यांच्या सदस्यांची नितीभ्रष्टता अधोरेखीत झाली. युती व आघाडीचे तुणतुणे वाजविताना त्यांच्यातील सत्तेचा खेळ समोर आला.एका सभापतीच्या विरोधात युती अन् आघाडीचे सर्वच सदस्य एकवटले, तर दुसºया सभापतीविरूद्ध भाजप, शिवसेना युतीला राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी सहकार्य केले. काँग्रेसने तीन सभापतींच्या अविश्वासावर वेगवेगळी भूमिका घेऊन आपल्या सभापतीला मात्र वाचविले. ‘त्या’ सभापतीला पायउतार करण्यासाठी युतीला सहकार्य केले. यातून केवळ सत्तेसाठी तमाशा सुरू असल्याचे उघड झाले. आता नवीन सभापती निवडीत ही बाब पुन्हा प्रकर्षाने स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पायउतार झालेले दोन्ही सभापती उच्च न्यायालयात गेले आहे. त्यामुळे यात रंगत वाढली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला संधीतीनपैकी दोन सभापतींवर अविश्वास पारित झाला. आता या दोन पदांवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सदस्य विराजमान होणार असल्याचे सांगितले जाते. ही निवड बहुमताने होईल. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीचे महत्त्व आपोआप वाढणार आहे. त्यांचे ३८ सदस्य आहे. तथापि अविश्वासाच्या वेळी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सहकार्य केल्याने परतफेड म्हणून एक पद राष्ट्रवादीला दिले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पुन्हा एकदा सत्तेसाठी सर्वांनीच नितीमत्ता गहाण ठेवल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, या सर्व प्रकारात त्या-त्या पक्षाचे वरिष्ठ नेतेही सहभागी असल्याची चर्चा आहे. नेत्यांनीच नितीमत्ता खुंटीला टांगल्याने जिल्हा परिषद सदस्य बेलगाम झाले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद