उमरखेड : स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त येथील राजस्थानी भवनात शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बाबूजींच्या प्रतिमेस हारार्पण करून व दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात झाली. कार्यक्रमाला आमदार नामदेव ससाने, माजी आमदार विजय खडसे, तहसीलदार आनंद देऊळगावकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती राम देवसरकर, कृषी शास्त्रज्ञ डॉ. विजय माने, डॉ. अनंतराव कदम, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, माधव वैद्य, गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखेडे, डॉ. रमेश मांडण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किशोर कपाळे, डॉ. गोविंद जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी ओमप्रकाश पेंदोर, राजू कोळेकर, गोपाल अग्रवाल, वर्षा वैद्य, फिरोज अन्सारी, बाळासाहेब भट्टड, शिवाजी रावते, अशोक वानखेडे, सविता कदम, धीरज पवार आदी उपस्थित होते.
पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे, पोलीस निरीक्षक सतीश खेडेकर, नारायण पांचाळ यांनी शिबिरला भेट दिली. सर्वांनी लोकमतच्या या उपक्रमाची प्रशंसा केली.
बॉक्स
शिबिराला यांची लाभली साथ
रक्तदान शिबिराला शारदा राजू कोळकर, राजू आत्माराम कोळकर, आशिष राठोड, सुधीर कदम, देवाशिष चेके, सविता कदम, नागोराव गाजूलवार, बंडू जाधव, आवेज अहमद अतीक अहमद, शेख सोहेल शेख रहीम, प्रवीणकुमार वानखेडे, अरविंद वाळके, पवन पानपट्टे, नितीन शिंदे, श्रीराम तिवारी, संदीप पेंटेवाड, योगेश सुरडकर, सुमित शिंदे, गोविंद तासके, नागेश मिराशे, सचिन चिंतले, अतुल गाडेकर यांच्यासह विविध संघटनांची साथ लाभली.