सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना लस देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांच्या पुढाकाराने चातारी व खरुस या दोन उपकेंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले.
चातारी येथे तालुका आराेग्य अधिकारी डॉ. किशोर कपाळे यांच्या नियंत्रणात डॉ. किरण घुटे यांनी लसीकरणाचा कार्यक्रम राबविला. यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, डॉ. संजय माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल माने आदी उपस्थित होते.
बॉक्स
आवश्यक लस उपलब्ध
तालुक्यातील सर्व उपकेंद्रांवर लस उपलब्ध करून दिली जात आहे. नागरिकांनी कोणताही गैरसमज न करता लसीकरण करून घेऊन स्वतः सुरक्षित राहावे. कुठल्याही अफवांना बळी पडू नये. नागरिक जेवढा प्रतिसाद जास्त देतील, तेवढ्या लसी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही राम देवसरकर यांनी दिली.